Sunday, September 14, 2025

महाराष्ट्रात सध्या मोठ्या प्रमाणावर कांद्याची विक्री नाही - नाफेड

महाराष्ट्रात सध्या मोठ्या प्रमाणावर कांद्याची विक्री नाही - नाफेड

मुंबई : नॅशनल ॲग्रीकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लि.(नाफेड) महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर कांद्याची विक्री करत असल्याने कांद्याच्या दरात घट होऊन शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याची चुकीची माहिती पसरविली जात आहे.

याबाबत नाफेड ने स्पष्ट केले आहे की, ग्राहक व्यवहार विभाग (DoCA), भारत सरकार यांच्या निर्देशांनुसार नाफेडने या वर्षी महाराष्ट्रात केवळ १२ मेट्रिक टन (MT) कांद्याचीच विक्री केली आहे. या पेक्षा अधिक विक्री झालेली नाही. त्याचप्रमाणे सध्या राज्यात नाफेडकडून कांद्याची विक्री केली जात नसल्याचेही नाफेडच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांचे हित जपणे व बाजारातील स्थिरता राखणे हेच नाफेडचे सर्वोच्च प्राधान्य असून नाफेड शासनाच्या निर्देशांनुसारच सातत्याने कार्यरत राहील, असे सांगून नाफेड अशा प्रकारच्या खोट्या बातम्या व अफवांचा तीव्र निषेध करते आणि त्या पसरविणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही नाफेड मार्फत देण्यात आला आहे.

Comments
Add Comment