‘दशावतार’ सिनेमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; २ दिवसांत केली इतकी कमाई !

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळीच लाट घेऊन आलेल्या ‘दशावतार’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच छाप सोडली आहे . कोकणच्या मातीत रुजलेल्या एका कलाकाराच्या भावविश्वावर आधारित असलेल्या या चित्रपटात ८० वर्षीय दिलीप प्रभावळकर यांनी बाबुली मिस्त्री ही प्रमुख भूमिका साकारली आहे. त्यांच्या अभिनयाचे आणि कथानकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


१२ सप्टेंबर २०२५ रोजी ‘दशावतार’ प्रदर्शित झाला आणि त्याच दिवशी रिलीज झालेल्या ‘बिन लग्नाची गोष्ट’ आणि ‘आरपार’ या सिनेमांमध्येही चुरस होती. मात्र प्रदर्शनानंतर पहिल्याच दोन दिवसांत मिळालेल्या प्रेक्षकांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे ‘दशावतार’ने स्पर्धेत आघाडी घेतली आहे.


चित्रपटाने पहिल्या दिवशी ५८ लाखांची कमाई करत समाधानकारक सुरुवात केली, तर दुसऱ्या दिवशी ही कमाई १.३९ कोटींपर्यंत गेली. सॅकनिल्कच्या माहितीनुसार, केवळ दोन दिवसांतच एकूण कमाईने २.२ कोटींचा टप्पा ओलांडला असून यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.


लेखक-दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी कोकणातील जीवन, लोककला आणि परंपरेशी निगडित महत्त्वाच्या सामाजिक मुद्द्यांना हात घालत ‘दशावतार’ साकारला आहे. दिलीप प्रभावळकर यांच्यासह महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शिनी इंदलकर आणि इतर अनुभवी कलाकारांनी आपल्या भूमिकांमधून कथा प्रभावीपणे उभी केली आहे.


सिनेमाच्या विषयवस्तू, अभिनय, सिनेमॅटोग्राफी आणि भावनिक मांडणीमुळे सोशल मीडियावर चित्रपटाची चांगलीच चर्चा सुरू आहे. कोकणच्या मातीतील साधेपणाला आणि लोककलेला मोठ्या पडद्यावर ठसा उमटवणाऱ्या ‘दशावतार’ने मराठी सिनेसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली आहे .

Comments
Add Comment

नृत्य, संगीत आणि प्रकाशाचा अद्भुत त्रिवेणी संगम!

नेहमीच्या सादरीकरणापेक्षा काहीतरी नवीन आणि अविस्मरणीय अनुभव देणारा 'रिदम ऑन फायर' हा खास डान्सिकल कार्यक्रम

निवडणुकांच्या रणधुमाळीत ‘आणीबाणी’ ओटीटीवर

मनोरंजन विश्वात ओटीटीने विशेष स्थान निर्माण केले आहे. ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपट आणि वेब सिरिजची

सलमान खानच्या हस्ते मॅजिक चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

अभिनेता जितेंद्र जोशीची प्रमुख भूमिका असलेल्या मॅजिक या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलर

‘रुबाब’चा टीझर प्रदर्शित

झी स्टुडिओजच्या ‘रुबाब’ या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, पहिलीच झलक आणि ‘तुझ्यासारखी

‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ ३० जानेवारीपासून चित्रपटगृहात

नाताळच्या निमित्ताने मराठी प्रेक्षकांसाठी एक जबरदस्त हास्याची भेट समोर आली आहे! प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य

आणखी एका कलाकाराच्या घराला आग! बॉलिवूड दिग्दर्शकालाही आगीच्या विळख्याचा धक्का

मुंबई: आज सकाळी मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील सोरेंटो अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली.