मुंबई विमानतळावर बनावट भारतीय पासपोर्टवर फिरताना आढळले नेपाळी आणि बांगलादेशी नागरिक

मुंबई: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अलीकडेच दोन परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. बनावट भारतीय पासपोर्टच्या  आरोपाखाली या दोघांना अटक करण्यात आली आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या आरोपींपैकी एक बांगलादेशी, कृष्णा मार्पन तमांग (वय २९) तर  दुसरा ६७ वर्षीय निरंजन नाथ सुबल हा बांगलादेशचा रहिवासी आहे.


या दोघांनी कोलकातामध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे  भारतीय पासपोर्ट मिळवले होते. त्यांनी या पासपोर्टचा वापर करून वेगवेगळ्या देशांमध्ये प्रवासदेखील केला होता. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, निरंजन नाथ शुक्रवारी मस्कत (ओमानची राजधानी) येथून मुंबईत परतला. त्याची कागदपत्रे चुकीची असल्याचे आढळल्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली तेव्हा त्याने पासपोर्ट फसवणूक केल्याची कबुली दिली.


वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, त्याच वेळी कृष्णा मार्पन तमांग विमानतळावरून परदेशात जाण्याच्या तयारीत होता आणि चेक-इन दरम्यान त्याला पकडण्यात आले. दोघांनाही सहार पोलिस ठाण्यात नेण्यात आले आणि चौकशी करण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, भारतीय न्याय संहितेच्या फसवणूक आणि बनावटीशी संबंधित कलमांव्यतिरिक्त, दोघांविरुद्ध पासपोर्ट कायद्याअंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



बनावट पासपोर्टवर दोन्ही आरोपींचा अनेक देशांमध्ये प्रवास


बनावट पासपोर्टच्या मदतीने या दोन्ही आरोपींनी अनेक देशांमध्ये प्रवास केल्याचेही तपासात उघड झाले आहे. कोलकातामध्ये त्यांच्यासाठी पासपोर्ट कोणी तयार केले आणि या टोळीत आणखी लोक सामील आहेत का, याचा पोलिस आता कृष्णा मार्पन तमांग आहेत. सहार पोलिसांचे पथक या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे. या अटकेमुळे विमानतळांच्या सुरक्षा व्यवस्थेबद्दल आणि पासपोर्ट पडताळणी प्रक्रियेबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होतात. या प्रकरणात आणखी काही खुलासे होऊ शकतात असे पोलिसांचे म्हणणे आहे.

Comments
Add Comment

ब्रिटीश पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी यशराज स्टुडिओला दिली भेट

मुंबई : ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर सध्या दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. कीर स्टार्मर यांनी आज,

मुंबई शहर व उपनगरातील प्रस्तावित १० टक्के पाणीकपात रद्द

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रातील

तोतया ईडी अधिकाऱ्यांचा सुळसुळाट; आता ईडीच्या नोटीसवर क्यूआर कोड

मुंबई : कोणीही तोतय्या ईडी अधिकारी बनून लोकांची आर्थिक फसवणूक करू नये यासाठी ईडीकडून दिल्या जाणाऱ्या सिस्टम

पालिकेच्या २ हजार ७०० कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू होणार

मुंबई : मुंबई महापालिका प्रशासनात ५ मे २००८ पूर्वी भरती झालेल्या २७०० कर्मचाऱ्यांचा जुन्या पेंशन योजनेत समावेश

बाणगंगा दीपोत्सवासाठी ४० लाखांचा खर्च! महापालिकेकडून २ कंत्राटदारांची नियुक्ती

मुंबई : बाणगंगा तलाव परिसरात त्रिपुरा पौर्णिमेला दरवर्षी दीपोत्सव साजरा करण्यात येतो. कार्तिक महिन्यात

घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी मुंबई महापालिकेचा पुढाकार, 'या' केंद्राची केली स्थापना

मुंबई (खास प्रतिनिधी) : वैवाहिक जीवनासाठी योग्य मार्गदर्शन मिळावे तसेच जोडप्यांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण कमी