Sunday, September 14, 2025

जाणून घ्या घटस्थापनेचा शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि नवरात्रीचे संपूर्ण वेळापत्रक !

जाणून घ्या घटस्थापनेचा शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि नवरात्रीचे संपूर्ण वेळापत्रक !

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवसांतच भारतात साजरा होणारा आणखी एक महत्वाचा आणि भक्तिभावाने साजरा केला जाणारा सण म्हणजे शारदीय नवरात्रोत्सव. देवीच्या नऊ रूपांची आराधना आणि उपासना करण्याचा हा काळ भक्तांसाठी अत्यंत मंगलमय मानला जातो. शारदीय नवरात्र या वर्षी सोमवार २२ सप्टेंबर २०२५ , पासून सुरू होत आहे. या दिवशी घटस्थापना होणार असून, यामध्ये विशिष्ट शुभ मुहूर्तावर देवीची स्थापना आणि पूजन केल्यास विशेष फलप्राप्ती होते.

घटस्थापनेचा शुभ मुहूर्त

शुभ मुहूर्त सुरू: २२ सप्टेंबर २०२५, सोमवार, मध्यरात्र ०१:२३ वाजता

शुभ मुहूर्त समाप्त: २३ सप्टेंबर २०२५, मंगळवार, दुपारी २:५५ वाजता

घटस्थापना पूजा विधी

पूजा करण्यापूर्वी घर आणि मंदिर स्वच्छ करा.

गंगाजल शिंपडून जागा शुद्ध करा.

ईशान्य किंवा उत्तर दिशेला एक स्वच्छ कपडा अंथरून देवीची मूर्ती/प्रतिमा स्थापन करा.

घट किंवा कलश स्थापना:

मातीच्या भांड्यात ज्वारी किंवा बार्लीचे धान्य पेरा.

तांब्याच्या कलशात शुद्ध पाणी, गंगाजल, सुपारी, नाणे, अक्षता ठेवा.

कलशावर नारळ ठेवून लाल चुनरी बांधा.

कुंकवाने स्वस्तिक बनवा आणि धागा बांधा.

पूजा आणि आराधना:

देवीला फळे, मिठाई, सुपारी, अक्षता अर्पण करा.

दुर्गा सप्तशती किंवा नवरात्र स्तोत्रचे पठण करा.

शेवटी आरती करून प्रसाद वाटावा.

शारदीय नवरात्र २०२५ – संपूर्ण दिनदर्शिका आणि रंग दिवस      तारीख         वार           देवीचे रूप   शुभ रंग दिवस १   २२ सप्टेंबर  सोमवार     शैलपुत्री        पांढरा दिवस २   २३ सप्टेंबर  मंगळवार   ब्रह्मचारिणी   लाल दिवस ३   २४ सप्टेंबर  बुधवार       चंद्रघंटा        निळा दिवस ४   २५ सप्टेंबर  गुरुवार      कुष्मांडा       पिवळा दिवस ५   २६ सप्टेंबर  शुक्रवार     स्कंदमाता    हिरवा दिवस ६   २७ सप्टेंबर  शनिवार     कात्यायनी   राखाडी दिवस ७   २८ सप्टेंबर  रविवार      जगदंबा       तांबडा दिवस ८   २९ सप्टेंबर  सोमवार     महागौरी      जांभळा दिवस ९    ३० सप्टेंबर  मंगळवार  सिद्धीदात्री    गुलाबी

२ ऑक्टोबर २०२५ रोजी दसरा आहे , या दिवशी नवमी हवन, दुर्गा विसर्जन, शस्त्रपूजा केली जाते .

नवरात्रीत दररोज देवीच्या वेगवेगळ्या रूपाची पूजा करून तिचा आशीर्वाद घेणे अत्यंत शुभ मानले जाते. दररोजच्या शुभ रंगानुसार वस्त्र परिधान केल्यास सौभाग्य, आरोग्य आणि सुखशांती प्राप्त होते.

Comments
Add Comment