हॉकी आशिया कपमध्ये भारतीय महिला संघ उपविजेता

अंतिम सामन्यात चीनकडून ४-१ ने पराभव


बीजिंग : महिला हॉकी आशिया कपमध्ये भारतीय संघ उपविजेता राहिला. हांगझोऊ येथे घरच्या मैदानावर चीनने भारताचा ४-१ असा पराभव करून विजेतेपद पटकावले. यासह चीनने महिला हॉकी विश्वचषकातही स्थान मिळवले आहे.


अंतिम सामन्यात भारताकडून एकमेव गोल नवनीत कौरने पहिल्याच मिनिटाला पेनल्टी कॉर्नरद्वारे केला. दुसऱ्या क्वार्टरमध्ये चीनने पुनरागमन केले. ओउ जिक्सियाने गोल करून गुण १-१ असा बरोबरी साधली. तिसऱ्या क्वार्टरमध्ये चीनच्या ली हाँगने गोल केला आणि २-१ अशी आघाडी घेतली. शेवटच्या क्वार्टरमध्ये चीनने आणखी २ गोल केले आणि सामना ४-१ असा जिंकला.

महिला स्पर्धेपूर्वी पुरुष हॉकी आशिया कपचा अंतिम सामना ५ सप्टेंबर रोजी भारतात खेळला गेला. टीम इंडिया संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिली आणि विजेतेपद जिंकले आणि विश्वचषकासाठी पात्र ठरली. अंतिम सामन्यात भारताने दक्षिण कोरियाचा ४-१ असा पराभव केला होता.
Comments
Add Comment

एअरपोर्टवर विराटच्या भेटीला जमली 'विराट' गर्दी; चाहत्यांचा घेराव... सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल

गुजरात : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे ११ जानेवारीला वडोदरा येथे खेळवला जाणारा आहे. या सामन्यापूर्वीच

बांगलादेशच्या मागणीला आयसीसीचा नकार

टी-२० विश्वचषकासाठी भारतात यावेच लागेल! दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने भारतात होणारे बांगलादेशचे सामने

ॲशेस मालिका : सिडनीच्या मैदानात स्टीव्ह स्मिथची बॅट तळपली

'द वॉल' द्रविडचा विक्रम मोडीत काढून ३७ वे कसोटी शतक पूर्ण सिडनी : ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथने

हरमनप्रीतची झेप; दीप्तीचे अव्वल स्थान निसटले!

आयसीसी टी-२० क्रमवारी जाहीर दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मंगळवारी जाहीर केलेल्या ताज्या महिला टी-२०

श्रेयस अय्यर फिटनेस परीक्षेत उत्तीर्ण

विजय हजारे करंडक : मुंबई, कर्नाटक, सौराष्ट्र उपांत्यपूर्व फेरीत दाखल मुंबई : विजय हजारे करंडक २०२५-२६ स्पर्धेच्या

मुस्तफिजूर रहमानसाठी संपूर्ण बांगलादेश वेठीला!

आयपीएल प्रसारणावरील बंदीमुळे क्रिकेटप्रेमींमध्ये संताप नवी दिल्ली : बीसीसीआयने अलीकडेच आयपीएल फ्रँचायझी