Sunday, September 14, 2025

IND vs PAK : पाकिस्तानला धूळ चारण्यासाठी भारतीय संघ सज्ज

IND vs PAK : पाकिस्तानला धूळ चारण्यासाठी भारतीय संघ सज्ज

मुंबई (प्रतिनिधी) : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटमधील संघर्ष हा जगातील सर्वात जुन्या व तीव्र क्रीडा प्रतिस्पर्धत गणला जातो. जेवहा जेव्हा हे दोन्ही संघ आमने-सामने उभे ठाकतात, तेव्हा तो केवळ एक सामना नसून तो इतिहास, भावना आणि अपक्षा यांचा संघर्ष असतो. रविवारी, दि. १४ सप्टेंबर रोजी दुबईमध्ये होणारी आशिया चषक स्पर्धेतील लढत पुन्हा एकदा चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढवणार आहे.

आकडेवारीपासून ते सध्याच्या कामगिरीपर्यंत भारताचे पाकिस्तानवर पारडे जड असल्याचे दिसून येते; परंतु हा हायवोल्टेज सामना असून इथे प्रत्येक षटक आणि प्रत्येक धाव एक नवा इतिहास रचते. आयसीसी स्पर्धांमध्ये पाकिस्तानवर भारताचे वर्चस्व स्पष्टपणे दिसून येते. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत झालेल्या १६ विश्वचषक सामन्यांपैकी १५ सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला आहे. यात एकदिवसीय विश्वचषकात दोन्ही संघांमध्ये आठ सामने झाले, ते सर्वच्या सर्व भारताने जिंकले आहेत.

टी-२० विश्ववषकात देखील आठ सामने खेळवण्यात आल असून त्यातील ७ सामने भारताने तर १ सामना पाकिस्तानने जिंकला आहे. १९८४ पासून आतापर्यंत खेळल्या गेलेल्या १६ आशिषा चषकांमध्ये भारत आणि पाकिस्तान मांच्यात १८ सामने झाले आहेत. यापैकी १० सामन्यांमध्ये भारताने, तर ६ सामन्यांमध्ये पाकिस्तानने विजय मिळवला आहे.

शुक्रवारी पाकिस्तानने ओमानविरुद्ध या स्पर्धेतील पहिला साना खेळताना ९३ धावांनी विजय मिळवला. या विजयानंतर सलमान आमा बोलताना म्हणाला, फलंदानीत आम्हाला अद्यापही सुधारणा कराव्या लागतील, गोलंदाजी शानदार होती. मी गोलंदाजीसाठी खुश आहे, आमच्याकडे तीन फिरकीपटू आहेत आणि तिघेही वेगवेगळे आहेत.

एकदिवसीय १८ सामने

भारत विजयी: ५० सामने

पाकिसतान विजयी ६ सामने

निकाल लागला नाही: २ सामने

टी-२० : ८ सामने

भारनिजयी: ॥ सामने

पाकिस्तान १ सामना

आशिया चषकातील सर्वात यशस्वी संघ कोणता?

भारत - ८ विजेतेपदे (१९८४,

१९८८, १९१०-११, १९९५ २०१०, २०१६, २०१८, २०२३)

श्रीलंका - ६ विजेतेपदे

पाकिस्तान- २ विजेतेपदे

गेल्या पाच वर्षांची स्थिती

सप्टेंबर २०२० पासून ते सप्टेंबर २०२५ पर्यंग, दोन्ही संघानी टी-२० स्वरूपात ५ वेळा एकमेकांचा सामना केला आहे. यापैकी भारत ३-२ अशा फरकाने पुढे आहे. ही अलीकडील कामगिरी भारताचा आत्मविश्वास वाढवते.

Comments
Add Comment