नेपाळ, फ्रान्सनंतर आता इंग्लंडमध्ये निदर्शन रॅली, लाखो लोकं रस्त्यावर

लंडन: नेपाळ आणि फ्रान्सनंतर आता आंदोलनाचे वारे ब्रिटनच्या रस्त्यावर देखील दिसून आले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे, ब्रिटनच्या इतिहासातील हे सर्वात मोठे उजव्या विचारसरणीचे निदर्शने असल्याचे म्हंटले जात आहे. येथील कट्टरपंथी नेता तसेच स्थलांतर विरोधी कार्यकर्ते टॉमी रॉबिन्सन यांच्या नेतृत्वाखाली लंडनमध्ये एक लाखांपेक्षा जास्त आंदोलकांनी शनिवारी रॅली काढली. मात्र,रॉबिन्सन समर्थकांच्या एका गटाची पोलिसांशी आणि विरोधकांशी झटापट झाल्याने रॅलीदरम्यान हिंसाचार झाला. पोलिसांवर बाटल्या फेकण्यात आल्या, अनेक अधिकाऱ्यांना लाथा आणि लाथा मारण्यात आल्या. परिस्थिती बिकट झाल्याने दंगलविरोधी पथके तैनात करावी लागली.


मेट्रोपॉलिटन पोलिसांच्या माहितीनूसार, या घटनेत २६ पोलीस कर्मचारी जखमी झाले असून त्यापैकी चार गंभीररीत्या जखमी आहेत. काहींची नाक मोडली, काहींचे दात तुटले, तर एका अधिकाऱ्याच्या मणक्याला दुखापत झाली. या हिंसाचारामध्ये सहभागी असलेल्या २५ लोकांना अटक करण्यात आली असून चौकशी सुरू आहे. या प्रकरणी असिस्टंट कमिशनर मॅट ट्विस्ट म्हणाले, “खूप लोक शांततेच्या हेतूने आले होते, पण मोठ्या संख्येने काही लोक हिंसाचार घडवण्यासाठी आले होते. त्यांनी पोलिसांवर हल्ला केला आणि सुरक्षा व्यवस्था भेदण्याचा प्रयत्न केला.”


या रॅलीत १ लाख १० हजार ते १ लाख ५० हजार लोक सहभागी झाले, तर याच्या विरोधात ‘मार्च अगेंस्ट फॅसिझम’ नावाची रॅली आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये सुमारे ५ हजार लोक सहभागी झाले. त्या ठिकाणी “शरणार्थ्यांचे स्वागत आहे” आणि “उजव्या विचारसरणीचा अंत करा” असे घोषवाक्ये देण्यात आली. फ्रान्सचे उजव्या विचारसरणीचे नेते एरिक झेमूर यांनी म्हटले की, युरोपवर मुस्लिम देशांकडून वसाहतीकरण होत आहे. तर एलन मस्क यांनी व्हिडीओ संदेशाद्वारे ब्रिटनमधील डाव्या विचारसरणीच्या सरकारवर टीका केली आणि म्हटले की, अनियंत्रित स्थलांतर ब्रिटनला संपवते आहे. रॅलीमध्ये अमेरिकन उजव्या विचारसरणीचे कार्यकर्ते चार्ली किर्क यांचीही आठवण करण्यात आली. त्यांच्या स्मरणार्थ एक मिनिटाचे मौन पाळण्यात आले आणि बगपाइपरने “अमेजिंग ग्रेस” धून वाजवली.


रॉबिन्सन हे इंग्लिश डिफेन्स लीगचे संस्थापक आहेत आणि ब्रिटनमधील सर्वात मोठ्या उजव्या विचारसरणीच्या चेहऱ्यांपैकी एक मानले जातात. त्यांच्या समर्थकांनी “स्टॉप द बोट्स”, “सेन्ड देम होम” आणि “वी वाँट अवर कंट्री बॅक” अशा घोषणा दिल्या.


अलीकडेच मोठ्या प्रमाणावर राजकीय आणि सामाजिक अस्थिरतेचे चित्र पाहायला मिळाले. नेपाळमध्ये युवा आंदोलकांनी बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि राजशाहीच्या पुनस्थापनेच्या मागणीसाठी रस्त्यावर आंदोलन केले, तर फ्रान्समध्ये वादग्रस्त कायदे आणि आर्थिक धोरणांच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर आंदोलन आणि रस्त्यावर हिंसाचाराच्या घटना घडल्या. दोन्ही देशांमध्ये आंदोलनाची सुरुवात शांततेत झाली होती, पण नंतर ते हिंसक वळणावर गेले, ज्यामध्ये पोलिस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली, संपत्तीचे नुकसान झाले आणि अनेक लोक जखमी झाले.

Comments
Add Comment

अमेरिका रशियावर कठोर निर्बंध लादणार

नाटोला चीनवर ५० ते १०० टक्के टॅरिफ लादण्याची मागणी वॉशिंग्टन डीसी (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष

सुशीला कार्की नेपाळच्या नव्या हंगामी पंतप्रधान

नेपाळची संसद बरखास्त, हंगामी सरकारचे नेतृत्व करणार नवी दिल्ली : नेपाळमध्ये मागील काही दिवसांपासून मोठ्या

‘या’ देशातील ९९ टक्के लोक वापरत नाहीत सोशल मीडिया

इंटरनेट सुविधा अत्यंत मर्यादित नैरोबी : आजकाल प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन दिसतो, ज्यात सोशल मीडियावर लोक

रशियामध्ये महाभयंकर भूकंप! त्सुनामीचा इशारा जारी

मॉस्को: शनिवारी रशियाच्या कामचटका द्वीपकल्पाच्या पूर्व किनाऱ्याजवळ भूकंपाचे धक्के बसले आहेत, ज्याची तीव्रता

काँगोमध्ये बोट उलटल्या, १९३ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये बहुतेक विद्यार्थी

काँगो: आफ्रिकन देश काँगोमधून एक मोठी बातमी येत आहे. येथील वायव्य इक्वेटूर प्रांतात झालेल्या दोन वेगवेगळ्या बोट

माजी सरन्यायाधीश सुशील कार्की यांच्या हाती नेपाळचे नेतृत्व, राष्ट्रपतींनी दिली शपथ

काठमांडू: नेपाळमधील राजकीय अस्थिरता आणि 'जनरेशन झेड' (Gen-Z) तरुणाईच्या जोरदार आंदोलनानंतर अखेर