Saturday, September 13, 2025

अरेरे! १४ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या वैष्णोदेवी यात्रेला पुन्हा लागला ब्रेक

अरेरे! १४ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या वैष्णोदेवी यात्रेला पुन्हा लागला ब्रेक
जम्मू काश्मीर: १४ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या माता वैष्णोदेवीच्या यात्रेला पुन्हा एकदा पुढील आदेश येईपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे तीर्थक्षेत्र मंडळाने हा निर्णय घेतला आहे.

वैष्णोदेवीची यात्रा पुढे ढकलली

जम्मू आणि काश्मीरमध्ये हवामान स्वच्छ झाल्यानंतर, लवकरच माता वैष्णोदेवीची यात्रा पुन्हा सुरू होऊ शकेल अशी अपेक्षा होती. परंतु आता पुन्हा एकदा बातमी येत आहे की सततच्या मुसळधार पावसामुळे १४ सप्टेंबरपासून सुरू होणारी यात्रा पुढील आदेशापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. माता वैष्णोदेवीच्या यात्रेला भवन आणि यात्रा मार्गावरील भाविकांच्या सुरक्षिततेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. 'X' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करताना बोर्डाने लिहिले की, "जय माता दी. भवन आणि यात्रा मार्गावर सततच्या पावसामुळे, १४ सप्टेंबर (रविवार) पासून सुरू होणारी माता वैष्णोदेवी यात्रा पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आली आहे. भाविकांना पुढील अधिकृत आदेशाची वाट पाहण्याची विनंती आहे."

यात्रा १४ सप्टेंबरपासून पुन्हा सुरू होणार होती

१२ सप्टेंबर रोजी माता वैष्णोदेवी श्राइन बोर्डाने त्यांच्या अधिकृत 'X' हँडलद्वारे १४ सप्टेंबरपासून वैष्णोदेवी यात्रा पुन्हा सुरू होत असल्याची माहिती दिली होती. श्राइन बोर्डने लिहिले होते की, "जय माता दी. हवामान अनुकूल राहिल्यास वैष्णो देवी यात्रा १४ सप्टेंबर (रविवार) पासून पुन्हा सुरू होईल. तपशील-बुकिंगसाठी, कृपया "Maa Vaishno Devi.org" ला भेट द्या.

खराब हवामानामुळे २६ ऑगस्टपासून यात्रा बंद

खरं तर २६ ऑगस्टपासून ही यात्रा बंद करण्यात आली आहे. कारण त्या दिवशी जम्मूत अत्यंत खराब हवामानादरम्यान माता वैष्णो देवी मंदिर मार्गावर भूस्खलन झाल्यामुळे ३५ हून अधिक यात्रेकरूंना आपला जीव गमवावा लागला होता आणि १० हून अधिक लोक जखमी झाले होते. यामुळे, माता वैष्णो देवी यात्रा पुढे ढकलण्यात आली. गेल्या काही दिवसांत कटरा येथे झालेल्या भूस्खलनानंतर प्रशासनाने हॉटेल्स आणि धर्मशाळा रिकामी करण्याचे आदेश जारी केले होते. त्यानंतर हवामान यात्रेसाठी अनुकूल झाल्यानंतर ही यात्रा १४ सप्टेंबरपासून पुन्हा सुरू करत असल्याची आनंद वार्ता बोर्डाने भाविकांना दिली होती. मात्र पुन्हा हवामान खराब झाल्यामुळे श्राइन बोर्डाने वैष्णोदेवी यात्रा काळी काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.  
Comments
Add Comment