Saturday, September 13, 2025

भायखळा के पी रोडवर भीषण अपघात पार्सल चा ट्रक उलटला

भायखळा के पी रोडवर भीषण अपघात पार्सल चा ट्रक उलटला
मुंबई: मुंबईतील भायखळ्याच्या के. पी. रोडवर पार्सलचा ट्रक उलटून अपघात, वाहन चालकाला झोप लागल्यानं अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे, रस्त्याच्या मधोमध ट्रक उलटल्यानं वाहतूक कोंडी तर झाली आहे, पण त्याचा नाहक मन:स्ताप कामाला जाणाऱ्या लोकांना सहन करावा लागत आहे. सदर घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी, सकाळच्या प्रहरी झालेल्या या अपघाताने भायखळा परिसरात काही कालावधीसाठी वाहतूक व्यवशता विस्कळीत झाली होती. तसेच बघ्यांची गर्दी देखील झाली होती, सध्या पोलिस घटनास्थळी  दाखल झाले असून, पंचनामा केला जात आहे.
Comments
Add Comment