Saturday, October 25, 2025
Happy Diwali

हार्बरवर साडेचौदा तासांचा ट्रॅफिक ब्लॉक

हार्बरवर साडेचौदा तासांचा ट्रॅफिक ब्लॉक

मुंबई : कुर्ला ते टिळकनगरदरम्यान वळण मार्गिकांच्या कामासाठी शनिवारी रात्री ११.०५ ते उद्या, रविवार दुपारी १.३५ वाजेपर्यंत साडेचौदा तासांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक आहे. ब्लॉक काळात वडाळा रोड ते मानखुर्ददरम्यान वाहतूक बंद असेल.

विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक

स्थानक : वडाळा रोड ते मानखुर्द

मार्ग : जाणारा आणि येणारा

वेळ : शनिवारी रात्री ११.०५ ते रविवार दुपारी १.३५

परिणाम : ब्लॉक वेळेत सीएसएमटी ते पनवेलदरम्यान धावणाऱ्या जाणाऱ्या आणि येणाऱ्या लोकल फेऱ्या रद्द होणार. डाळा रोड ते मानखुर्ददरम्यान लोकल रद्द राहणार.

शनिवार १३ सप्टेंबर २०२५ रोजी ब्लॉकच्या आधी शेवटची लोकल : रात्री ९.५२ पनवेल-सीएसएमटी आणि रात्री १०.१४ सीएसएमटी - पनवेल

रविवार १४ सप्टेंबर २०२५ रोजी ब्लॉकच्या नंतरची पहिली लोकल : दुपारी १.०९ पनवेल-सीएसएमटी आणि दुपारी १.३० सीएसएमटी-पनवेल

दिवा-कोपर मेमू रद्द

ठाणे ते कल्याणदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी मध्य रेल्वेने उद्या, रविवारी ब्लॉक घोषित केला आहे. ब्लॉक वेळेत धावणाऱ्या १८ मेल-एक्स्प्रेस विलंबाने धावतील. वसई रोड येथून सुटणारी सकाळी ९.५०ची मेमू कोपर स्थानकापर्यंतच धावणार आहे. परतीचा प्रवास कोपर येथून सकाळी ११.४५ला सुरू होईल. दिवा ते कोपरदरम्यान मेमू रद्द राहणार आहे. ट्रान्सहार्बर मार्गावर ब्लॉक नाही.

स्थानक: ठाणे ते कल्याण

मार्ग: पाचवा आणि सहावा

वेळ : सकाळी ९ ते दुपारी १ पर्यंत

परिणाम : ब्लॉकवेळेत पाचव्या-सहाव्या मार्गिकेवरील मेल-एक्स्प्रेस जाणाऱ्या आणि येणाऱ्या जलद मार्गावर वळवणार. काही गाड्या १५ ते २० मिनिटे विलंबाने धावणार.

पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक

पश्चिम रेल्वेने बोरिवली ते गोरेगावदरम्यान रविवारी मध्यरात्री ब्लॉक जाहीर केला आहे. या ब्लॉक दरम्यान रूळांसह सिग्नलची देखभाल-दुरुस्ती करण्यात येईल. या ब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेवर रविवारी दिवसा ब्लॉक नसेल.

स्थानक : बोरिवली ते गोरेगाव

मार्ग : जाणारा आणि येणारा धीमा

वेळ : रविवार १४ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२.३० ते रविवारी पहाटे ४.३०

परिणाम : ब्लॉकमुळे बोरिवली ते अंधेरीदरम्यान धावणाऱ्या जाणाऱ्या आणि येणाऱ्या मार्गावरील धीम्या लोकल या जाणाऱ्या आणि येणाऱ्या जलद मार्गावर वळवण्यात येतील. फलाट उपलब्ध नसल्याने जलद मार्गावरुन जातेवेळी गाड्या राममंदिर रेल्वे स्थानकात थांबणार नाही. ब्लॉकमुळे काही फेऱ्या रद्द राहणार असून, रात्री उशिरा धावणाऱ्या काही लोकल विलंबाने धावणार आहेत.

Comments
Add Comment