
AI चॅटबॉट ChatGPT तयार करणाऱ्या OpenAI कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सॅम ऑल्टमॅन हे त्यांच्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) या तंत्रज्ञानावर सतत मतप्रदर्शन करणारे ऑल्टमॅन अनेकदा अशा विधानांची उधळण करतात की ज्यामुळे जगभरात चिंता आणि चर्चेचं वातावरण निर्माण होतं. ऑल्टमॅन यांचं ठाम मत आहे की, AI जितका मानवजातीसाठी फायदेशीर आहे, तितकाच तो धोकादायक ठरू शकतो. ही द्विधा भूमिका ते नेहमीच मांडतात. त्यामुळंच त्यांच्या वक्तव्यांकडे जागतिक स्तरावर लक्ष वेधलं जातं. आता पुन्हा एकदा त्यांनी केलेलं विधान चर्चेत आलं आहे. विशेष म्हणजे यावेळीसुद्धा त्यांचं मत AIचा धोका आणि संधी याच्याशी संबंधित असल्याने तज्ज्ञ आणि नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
सॅम ऑल्टमॅन यांचा धक्कादायक इशारा
OpenAI चे CEO आणि ChatGPTचे निर्माते सॅम ऑल्टमॅन यांनी पुन्हा एकदा संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यांनी केलेल्या नव्या वक्तव्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर चिंता वाढली आहे. ऑल्टमॅन यांनी इशारा दिला आहे की, ChatGPT सारख्या AI मॉडेल्सचा गैरवापर करून कोरोनासारख्या एखाद्या नव्या महामारीची निर्मिती होऊ शकते. त्यांच्या मते, हे मॉडेल्स बायोलॉजीच्या क्षेत्रात अत्यंत उपयोगी ठरत आहेत. मात्र, हाच उपयोग चुकीच्या पद्धतीने केला गेला तर त्याचे परिणाम मानवजातीसाठी धोकादायक ठरू शकतात. त्यांनी स्पष्ट केलं की, “AI ही दोन धारी तलवार आहे. एका बाजूला ती संशोधन आणि औषधनिर्मितीमध्ये क्रांतिकारक बदल घडवू शकते, तर दुसऱ्या बाजूला तिचा वापर करून कोणीतरी महामारीसारखा मोठा धोका निर्माण करू शकतो.” यामुळे जगभरातील वैज्ञानिक आणि धोरणकर्त्यांमध्ये या विषयावर गंभीर चर्चा सुरू झाली आहे..

मिझोरम : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे सध्या दोन दिवसांच्या ईशान्य भारत दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यातील सर्वात महत्त्वाची घटना मिझोरम राज्यात पार ...
AIमुळे कोरोनासारखी महामारी तयार होऊ शकते”- सॅम ऑल्टमॅन
आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) च्या प्रगतीमुळे जगभरात संधी आणि धोके या दोन्ही गोष्टींबाबत चर्चा सुरू आहे. अशातच OpenAI चे CEO सॅम ऑल्टमॅन यांनी एका शोमध्ये दिलेलं वक्तव्य खळबळजनक ठरलं आहे. शोदरम्यान ऑल्टमॅन यांना प्रश्न विचारण्यात आला होता की, “AI मधील अशी कोणती कमतरता आहे ज्यामुळे आपण चिंतेत आहात?” या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितलं की, “AI चा वापर करून कोरोनासारखी महामारी निर्माण केली जाऊ शकते. आणि हाच मुद्दा मला सर्वाधिक चिंतेत टाकतो.” त्यांनी पुढे स्पष्ट केलं की, या विषयावर सतत जागतिक स्तरावर चर्चा होत आहे. मात्र, केवळ धोक्याबद्दल बोलणं पुरेसं नाही; तर हा धोका प्रत्यक्षात कसा टाळता येईल यावर गंभीरपणे उपाययोजना करणं तितकंच महत्त्वाचं आहे. ऑल्टमॅन यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा AI च्या भविष्यातील सुरक्षिततेबाबत वादंग पेटले आहेत.