देशात पहिलाच उपक्रम; दिल्लीत ‘हाय-टेक हॉटलाईन व्हॅन’चे अनावरण

नवी दिल्ली: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आज राष्ट्रीय राजधानीची पहिली 'हॉटलाईन मेंटेनन्स व्हॅन' सुरू केली. वीजपुरवठा खंडित न करता थेट विजेच्या तारांची दुरुस्ती करण्यासाठी ही डिझाइन केली आहे.


या व्हॅनची सुरूवात शालिमार बाग विधानसभा मतदारसंघात एक प्रायोगिक प्रकल्प म्हणून करण्यात आली आहे. तर लवकरच इतर मतदारसंघांमध्येही अशाच व्हॅन दिसतील. गुप्ता यांच्या मते, देशात असा उपक्रम पहिल्यांदाच सुरू करण्यात आला आहे. यावेळी दिल्लीचे ऊर्जा मंत्री आशिष सूद आणि इतर महत्त्वाचे नेते तसेच अधिकारी उपस्थित होते.


मुख्यमंत्र्यांनी विधानसभा मतदारसंघात वीज, पाणी, रस्ते आणि सार्वजनिक सोयींशी संबंधित अनेक प्रकल्पांचेही उद्घाटन केले.


त्यांनी सांगितले की, परिसरात नवीन पथदिवे बसवले जात आहेत, तर संपूर्ण दिल्लीमध्ये ४४,००० हून अधिक नवीन दिवे बसवले जातील. गुप्ता यांनी गुरु गोविंद सिंग कॉलेज जवळील रिंग रोडला लागून असलेल्या नवीन रस्त्याचीही पाहणी केली, जो १२ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीने बांधला गेला आहे आणि त्यामुळे परिसराची रिंग रोडशी कनेक्टिव्हिटी वाढणार आहे.


त्यांनी हैदरपूर भागात नवीन 'पीएम श्री स्कूल'ची घोषणाही केली. हे या परिसरातील १२ वी पर्यंतचे पहिलेच विद्यालय असेल आणि तेथे इंग्रजी माध्यमात विज्ञान विषय शिकवले जातील.


मुख्यमंत्र्यांनी असेही सांगितले की, परिसरातून जाणारी मुनक कालवा लवकरच दिल्ली सरकारद्वारे देखरेख केली जाईल, आणि अपघात टाळण्यासाठी त्याच्या दोन्ही बाजूला योग्य कुंपण किंवा बॅरिकेडिंग केले जाईल, तर छठ पूजेसाठी योग्य घाट बांधले जातील.


दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, वीज विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या प्रलंबित पदोन्नतीचा प्रश्न सोडवल्याबद्दल सरकारचे आभार मानण्यासाठी सचिवालयात त्यांची भेट घेतली. त्यांच्या म्हणण्यानुसार, १०० हून अधिक कर्मचाऱ्यांनी पदोन्नतीचा लाभ घेतला, जे केवळ एक प्रशासकीय निर्णय नसून न्याय मिळाल्यासारखे आहे.

Comments
Add Comment

"शेतकऱ्यांचे ऋण फेडण्याची वेळ"! अभिनेता सोनू सूदने पंजाबमधील पूरग्रस्तांना दिला आधार

पंजाब : कोविड काळात केलेल्या कार्यामुळे अभिनेता सोनू सूद अनेकदा चर्चेत आला होता . आता पुन्हा एकदा गरजूंना मदतीचा

पंतप्रधान मोदींच्या आईचा AI व्हिडिओ कोणी बनवला? दिल्ली पोलिसांची कारवाई

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि त्यांच्या दिवंगत आई हिराबेन यांचा डीपफेक व्हिडिओ वादाला मोठे राजकीय

केंद्र सरकार मणिपूरच्या लोकांसोबत खंबीरपणे उभे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मणिपूरमधील लोकांना आश्वासन, केले शांततेचे आवाहन चुराचंदपूर: पंतप्रधान नरेंद्र

Surya VHF : अमेरिकेच्या F 35 आणि चीनच्या J 20 विमानाचा वेध घेण्यास सक्षम असलेले भारताचे रडार

नवी दिल्ली : भारताने पहिल्या स्वदेशी सूर्या व्हीएचएफ (व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी) रडारच्या क्षमतेत वाढ केली आहे. हे

मोदींचा मणिपूरमध्ये दीड तास रस्त्यावरुन प्रवास, मुसळधार पावसातून पीएमचा ताफा सभास्थळी

मणिपूर : कुकी आणि मैतेई समाजाच्या वांशिक हिंसेमुळे मणिपूरमध्ये काही काळ कायदा सुव्यवस्था बिघडली असल्याचे

राज्य स्थापनेनंतर ३८ वर्षांनी मिझोरमला मिळाली रेल्वे

मिझोरम : मिझोरम या राज्याची स्थापना २० फेब्रुवारी १९८७ रोजी झाली. राज्य स्थापनेनंतर जवळपास ३८ वर्षांनी मिझोरम