Friday, November 14, 2025

महाराष्ट्रातील ३४ जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापतींसाठी आरक्षण जाहीर

महाराष्ट्रातील ३४ जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापतींसाठी आरक्षण जाहीर

मुंबई : महाराष्ट्रात दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीआधी केंद्रीय निवडणूक आयोग बिहार प्रमाणेच महाराष्ट्रातही मतदार याद्यांची सखोल फेरतपासणी करण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोग लवकरच होणार असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तयारी करत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतींसाठी आरक्षण जाहीर केले. एकूण ३४ जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदासाठी आरक्षण जाहीर करण्यात आले.

कोणत्‍या जिल्‍ह्यात कोणते आरक्षण ?

1. ठाणे -सर्वसाधारण (महिला)

2. पालघर अनुसुसूचित जमाती

3. रायगड- सर्वसाधारण

4. रत्नागिरी- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

5. सिंधुदुर्ग सर्वसाधारण

6. नाशिक -सर्वसाधारण

7. धुळे -नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

8. नंदूरबार-अनुसूचित जमाती

9. जळगांव सर्वसाधारण

10. अहिल्यानगर अनुसूचित जमाती (महिला)

11. पुणे -सर्वसाधारण

12. सातारा- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

13. सांगली सर्वसाधारण (महिला)

14. सोलापूर नागरिकांचा मागास प्रवर्ग

15. कोल्हापूर- सर्वसाधारण (महिला)

16. छत्रपती संभाजीनगर -सर्वसाधारण

17. जालना नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

18. बीड अनुसूचित जाती (महिला)

19. हिंगोली -अनुसूचित जाती

20. नांदेड नागरिकांचा मागास प्रवर्ग

21. धाराशिव नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

22. लातूर सर्वसाधारण (महिला)

23. अमरावती सर्वसाधारण (महिला)

24. अकोला अनुसूचित जमाती (महिला)

25. परभणी अनुसूचित जाती

26. वाशिम अनुसूचित जमाती (महिला)

27. बुलढाणा -सर्वसाधारण

28. यवतमाळ- सर्वसाधारण

29. नागपूर नागरिकांचा मागास प्रवर्ग

30. वर्धा- अनुसूचित जाती

31. भंडारा नागरिकांचा मागास प्रवर्ग

32. गोंदिया सर्वसाधारण (महिला)

33. चंद्रपूर अनुसूचित जाती (महिला)

34. गडचिरोली -सर्वसाधारण (महिला)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >