देवी दुर्गेचा आशीर्वाद हवा आहे? मग नवरात्रीपूर्वी घरात या वस्तू नक्की आणा !

मुंबई : या वर्षी शारदीय नवरात्रोत्सवाचा शुभारंभ २२ सप्टेंबर २०२५ रोजी होत आहे. नवरात्रोत्सव हा देवी दुर्गेच्या उपासनेचा आणि भक्तिभावाचा अत्यंत पवित्र काळ मानला जातो. नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात देवीच्या नऊ रूपांची भक्तिभावाने पूजा केली जाते. प्रत्येक रूप वेगळ्या शक्तीचे आणि गुणांचे प्रतीक असते. या काळात उपवास, ध्यान, पूजा आणि जपाद्वारे भक्त देवीला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात. शारदीय नवरात्रोत्सव संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने साजरा केला जातो. धार्मिक ग्रंथांनुसार, नवरात्रीच्या आधी काही विशेष वस्तू घरी आणल्यास देवीचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो, घरात सुख-समृद्धी नांदते आणि जीवनात शुभ घटना घडतात. त्यामुळे नवरात्रीपूर्वी कोणत्या वस्तूंची खरेदी करावी, कोणत्या गोष्टी घरात आणाव्यात आणि कोणत्या वस्तू घरातून दूर कराव्यात, याचे खास मार्गदर्शन आवश्यक आहे.



नवरात्रीपूर्वी कोणत्या शुभ वस्तू घरी आणाव्यात?


चांदीचे नाणे – लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते, धनवृद्धीसाठी शुभ.
कलश – माती, चांदी, पितळ किंवा सोन्याचा कलश घरात आणल्याने घरात सुख-शांती नांदते.
कमळाचे फूल – देवी लक्ष्मी व दुर्गेचे आवडते फूल, पूजेसाठी अत्यंत शुभ.
दुर्गेची मूर्ती किंवा फोटो – घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, वास्तुदोष दूर होतात.
श्रीयंत्र – यश, समृद्धी आणि सकारात्मकतेसाठी उपयुक्त.
१६ श्रृंगार वस्तू – विवाहित स्त्रियांना अखंड सौभाग्यासाठी देवीला अर्पण कराव्यात.
लाल चंदनाची माळ – देवीच्या जपासाठी अत्यंत प्रभावी मानली जाते.



नवरात्रीपूर्वी घरातून काय काढून टाकावे?


तुटलेल्या वस्तू – तुटलेली चप्पल, तुटलेली काचेची भांडी किंवा इतर तुटलेल्या वस्तू
जुन्या, खराब झालेल्या मूर्ती किंवा चित्रे – देवी-देवतांचे अर्धवट, खराब चित्र ठेवू नये
केस व नख कापणे – नवरात्रीदरम्यान हे निषिद्ध मानले जाते, म्हणून या काळात हि कामे करू नये .


धार्मिक श्रद्धेनुसार, या छोट्या कृती तुमच्या घरात सुख, समृद्धी आणि देवीचे विशेष आशीर्वाद घेऊन येतात. त्यामुळे शारदीय नवरात्रीपूर्वी घरात स्वच्छता करून, या शुभ वस्तूंचे स्वागत करा आणि भक्तिभावाने देवीची पूजा करा.

Comments
Add Comment

Vaishno Devi Yatra 2025 Resume: वैष्णो देवी यात्रेला पुन्हा सुरूवात होणार? नवरात्रीपूर्वी मंदिराचे दरवाजे खुलणार

जम्मू काश्मीर: माता वैष्णो देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी येत आहे. गेल्या १७

श्रद्धा आणि शक्तीचा उत्सव

नवरात्र हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा सण आहे. हा उत्सव नऊ रात्री आणि दहा दिवस चालतो. या काळात

या वर्षी १० दिवसांची नवरात्र ! अनेक वर्षांनी आला योगायोग

मुंबई : हिंदू दिनदर्शिकेनुसार , शारदीय नवरात्रीचा पहिला दिवस २२ सप्टेंबर २०२५ रोजी आहे. या काळात देवी दुर्गेच्या

Navratri 2025 : नवरात्री मंडपामुळे ठाण्यात 'या' भागात वाहतूक कोंडी

ठाणे: नवरात्री सणाच्या तयारीमुळे ठाण्यातील टेंभीनाका चौकात मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून येते. आजपासून येथे

Navratri 2025 : यंदा नवरात्र ९ दिवसांची नव्हे तर १० दिवसांची! जाणून घ्या खास कारण

दरवर्षी शारदीय नवरात्र भक्तिपूर्ण वातावरणात साजरी केली जाते. संपूर्ण नऊ दिवस भक्त दुर्गा देवीचे उपास करतात,

Navratri: नवरात्रीत उपवास करताय तर जरूर लक्षात ठेवा या टिप्स

मुंबई: हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक म्हणजे नवरात्री. आजपासून शारदीय नवरात्रीला सुरूवात होत आहे. यानंतर ९