चिथावणीखोर वक्तव्य करून अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संजय राऊतांवर कारवाई करण्याची मागणी

शिवसेनेच्या शिष्टमंडळाची मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती यांच्याकडे मागणी


मुंबई: चिथावणीखोर वक्तव्य करून अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संजय राऊत यांच्यावर कारवाई करा अशी मागणी आज शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्याकडे केली. शिवसेनेच्या वतीने तशी मागणी करणारे निवेदन त्यांनी आज मुंबई पोलीस आयुक्तांना देण्यात आले.

नेपाळमध्ये झालेल्या हिंसाचाराची चित्रफित प्रसारित करून देशातही अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते अशी प्रक्षोभक वक्तव्ये करून संजय राऊत यांनी अराजक निर्माण करण्याचे मनसुबे जाहीर केले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर टाकलेली ही पोस्ट चिथावणीखोर तर आहेच पण त्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकी देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

लोकशाही मार्गाने आपण विजय मिळवू शकत नाही त्यामुळे अशी वक्तव्ये करून समाजात अशांतता आणि अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून वारंवार सुरू आहे. निवडणूक आयोग, न्यायव्यवस्था, प्रशासन, प्रसारमाध्यमे या लोकशाहितील चारही स्तंभांवर अविश्वास व्यक्त करून अराजक माजवण्याचे त्यांचे प्रयत्न यापूर्वीही उघड झाले आहेत. नेपाळमध्ये झाली तशीच हिंसा भारतात होऊ शकते असे म्हणून देशात हिंसाचार घडवण्याच्या धमक्या देणाऱ्यांवर कारवाई व्हायलाच हवी अशी आग्रही मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.



संजय राऊत यांच्या या चिथावणीखोर वक्तव्याची तातडीने दखल घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी या पत्राद्वारे पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली आहे. यावेळी शिवसेना खासदार मिलिंद देवरा, शिवसेना सचिव संजय मोरे, आमदार तुकाराम काते, शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम, शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे, प्रा.ज्योती वाघमारे, संजना घाडी, माजी नगरसेविका सुशिबेन शहा, तृष्णा विश्वासराव, सुवर्णा करंजे, आशा मामेडी हे उपस्थित होते.
Comments
Add Comment

नवीन मोबाईल घेण्याचा विचार करताय का? तर हे तुमच्यासाठी आहेत चांगले ऑप्शन

ओप्पो १५ सप्टेंबरला भारतात नवीन F31 सिरीज स्मार्टफोन करणार लाँच

‘मिशन वात्सल्य योजने’चा सर्व विधवा व एकल महिलांना मिळणार लाभ - आदिती तटकरे

मुंबई : कोविड १९ या संसर्गजन्य आजारामुळे दोन्ही पालकांचे निधन होऊन अनाथ झालेल्या बालकांना तसेच विधवा महिलांना

नेव्हल परिसरातील रायफल चोरी प्रकरणात ट्विस्ट; आरोपी आणि तक्रारदार एकमेकांना ओळखतात

मुंबई: मुंबई पोलीस गुन्हे शाखेने 'नेवी नगर रायफल चोरी' प्रकरणाच्या तपासात एक महत्त्वाचा खुलासा केला आहे. आरोपी

तुमच्याकडे गाडी आहे का? तर हे जरूर वाचा...

सीएटने सर्व टायरच्या किमती केल्या कमी मुंबई : भारत सरकारने अ

महावितरण पहिल्या क्रमांकावर, केंद्राच्या क्रमवारीत १०० पैकी मिळाले ९३ गुण

मुंबई : केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या क्रमवारीत महावितरणने १०० पैकी ९३ गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे.

पंतप्रधानांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त, एसटीच्या ७५ बसस्थानकावर 'मोफत वाचनालय'

मुंबई: देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त एसटीच्या ७५ प्रमुख बस