Friday, September 12, 2025

स्कूल व्हॅन आणि स्कूल बसची धडक, अपघातात अनेक विद्यार्थी जखमी

स्कूल व्हॅन आणि स्कूल बसची धडक, अपघातात अनेक विद्यार्थी जखमी

नागपूर : मानकापूर चौकात कल्पना टॉकीज जवळ शुक्रवारी सकाळी अपघात झाला. स्कूल व्हॅन चालक स्कूल बसला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होता. या प्रयत्नात स्कूल व्हॅनने स्कूल बसला धडक दिली. यामुळे अपघात झाला. अपघातात सात विद्यार्थी जखमी झाले. चालकासह दोन मुलांची प्रकृती गंभीर आहे.

शुक्रवारी सकाळी भवन्स कोराडीच्या दिशेने स्कूल व्हॅन आणि स्कूल बस जात होत्या. यावेळी स्कूल व्हॅन चालक स्कूल बसला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होता. या प्रयत्नात स्कूल व्हॅनने स्कूल बसला धडक दिली. यामुळे अपघात झाला. अपघातात सात विद्यार्थी जखमी झाले. चालकासह दोन मुलांची प्रकृती गंभीर आहे. सर्व जखमींना उपचारांसाठी इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथे दाखल केले आहे. पोलीस अपघात प्रकरणी तपास करत आहेत.

परिसरात उड्डाणपुलाचे काम सुरू असल्यामुळे अनेकदा अपघात होतात. यामुळे या भागात वाहन चालकांसाठी ठिकठिकाणी मार्गदर्शक फलक लावण्याची मागणी नागरिक करत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >