Friday, September 12, 2025

चिंतामणीचे सेवेकरी पांडुरंग मोरेंवर आला म्युझिक व्हिडीओ

चिंतामणीचे सेवेकरी पांडुरंग मोरेंवर आला म्युझिक व्हिडीओ

मुंबई : मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव देशभरातल्या भाविकांसाठी चर्चेचा विषय असतो. हा गणेशोत्सव उत्साहात साजरा होतो तो बाप्पाच्या सेवेतील सेवेकऱ्यांमुळे आणि त्यांच्या अविरात श्रमामुळे. चिंचपोकळीचा चिंतामणी हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान. नवसाला पावणाऱ्या आपल्या या बाप्पाला भेटण्यासाठी अनेक जण आतुर असतात. त्यांच्या दर्शनाची ही अनुभूती सुखाची ठरते ती कार्यकर्त्यांमुळे. चिंतामणीच्या चरणी मागच्या दोन दशकाहून अधिक काळ अविरत सेवा देणारे व्यक्तिमत्व म्हणजे पांडुरंग मोरे उर्फ पांड्या मामा. मागच्या तीन दशकांहून अधिक काळ चिंतामणीच्या सेवेमध्ये जीवन व्यतीत करणारे सगळ्यांचे लाडके पांडुरंग मोरे अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे.

पांडुरंग मोरे यांच्या कार्याला सलाम करणारे एक आगळे वेगळे गीत मयेकर फिल्सच्या माध्यमतून साकारण्यात आले आहे. ‘सुखकर्ता मोरया’ या गाण्यामध्ये पांडुरंग मोरे यांच्या सेवाकार्याला वंदन करण्यात आले आहे. केवल वालंज यांच्या आवाजातून व विपुल शिवलकर यांच्या शब्द सुमनांमधून साकारलेले हे गीत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे. दृकश्राव्य माध्यमातून गीताचे दिग्दर्शन प्रथमेश अवसरे यांनी केले आहे, तर या गीतामागची पटकथा पराग सावंत यांनी लिहिली आहे. पांडुरंग मोरे यांच्या भूमिकेत काम केलेले शशिकांत दळवी यांनी सुद्धा अत्यंत तन्मयतेने आपली भूमिका वठवल्याचे पाहायाला मिळते.

“पांडुरंग मोरे यांचे कार्य प्रकाशझोतात येणे गरजेचे”

पांडुरंग मोरे मागचे ३५ ते ४० वर्ष, चिंचपोकळीच्या चिंतामणीची मनोभावे सेवा करत आहेत. अनेक वर्षांपासून माझी अशी इच्छा होती की त्यांचं काम लोकांसमोर आलं पाहिजे. चिंचपोकळीचा चिंतामणी हा विषय केंद्रस्थानी ठेवून, मग आम्ही म्युझिक व्हिडीओ तयार करण्याचा विचार केला, जो आज लोकांच्या पसंतीस उतरला आहे, असे निर्माते मयुरेश अवधूत मयेकर यांनी सांगितले.

Comments
Add Comment