Friday, September 12, 2025

पंतप्रधानांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त, एसटीच्या ७५ बसस्थानकावर 'मोफत वाचनालय'

पंतप्रधानांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त, एसटीच्या ७५ बसस्थानकावर 'मोफत वाचनालय'

मुंबई: देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त एसटीच्या ७५ प्रमुख बस थांब्यांवर "मोफत वाचन कक्ष" उघडण्यात येणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घोषणा केली.  

एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक म्हणाले की, शिवसेना संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि भाजपचे ज्येष्ठ नेते विनय सहस्रबुद्धे यांच्या संकल्पनेतून, यावर्षी आम्ही ७५ प्रमुख एसटी बस स्टॉपवर सर्व सामान्य नागरिकांसाठी “मोफत वाचनालय” उघडले जाणार आहे. विशेष म्हणजे या वाचनालयातील पुस्तकं घरीही नेऊ शकता. या वाचनालयात मराठी भाषेतील संहित्याकांची विविध पुस्तके उपलब्ध केली जाणारआहेत.

प्रसिध्द मराठी संहित्यकांची पुस्तकं वाचकांना घरी घेऊन जाता येणार

वी.स. खांडेकर, वि.वा शिरवाडकर, कवी नारायण सुर्वे, पु.ल. देशपांडे यांसारख्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय लेखक आणि कवींची पुस्तके, कविता संग्रह, नामदेवराव ढसाळ, भालचंद्र नेमाडे, शंकर पाटील, व्ही.पी. काळे, विश्वास पाटील इत्यादी कादंबरीकारांच्या कादंबऱ्या सर्वसामान्यांसाठी या वाचनालयात ठेवल्या जातील. ही पुस्तके संबंधित बस स्थानकावरील एसटी कर्मचाऱ्यांकडे नोंदणीकृत करता येतील आणि लोक ती घरी घेऊन जाऊन वाचू शकतील आणि वाचल्यानंतर परत आणू शकतील.

लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांच्या संदर्भ पुस्तकांचा समावेश

यासोबतच, महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काही मूलभूत संदर्भ पुस्तके देखील या  वाचनालयात उपलब्ध करून दिली जातील. या सर्व सेवा मोफत असतील. स्थानिक वर्तमानपत्रे देखील दररोज उपलब्ध करून दिली जातील.

वाचन कोपरा

एसटीच्या पमुख बस स्थानकाच्या परिसरात एक "वाचन कट्टा" तयार केला जाईल, ज्यामध्ये मराठी भाषेचा समृद्ध वारसा असेल, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या सूचनांनुसार, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक विभागाकडून लोकाभिमुख उपक्रम सुरू केले जात आहेत. या मालिकेत, मराठी साहित्याला प्रोत्साहन देण्यासाठी, एसटी बस स्थानकावर "वाचन कट्टा" तयार करून आम्ही सर्वसामान्यांना एक अमूल्य भेट देत आहोत.

Comments
Add Comment