Friday, September 12, 2025

कॉरिडॉरसाठी आमची घरं-दारं पाडण्यापेक्षा विठ्ठल मंदिराचा काही भाग पाडा

कॉरिडॉरसाठी आमची घरं-दारं पाडण्यापेक्षा विठ्ठल मंदिराचा काही भाग पाडा

दुकानदाराच्या विचित्र वक्तव्याने भाविक संतप्त

सोलापूर : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरा बाबत शहरातील एका दुकानदाराने वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्याच्या या वक्तव्याचा वारकरी संप्रदायासह भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आमची घरं-दारं पाडण्यापेक्षा विठ्ठल मंदिराचा काही भाग पाडावा, अशी अचंबित करणारी आणि चिड निर्माण करणारी विचित्र मागणी त्याने केली आहे. कॉरिडॉरला विरोध करण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत रा.पा.कटेकर नावाच्या दुकानदाराने हे वादग्रस्त वक्तव्य केले. वारकरी संप्रदायाच्या भावनेला व विठ्ठल मंदिराला हात घातल्याने सर्वच स्तरातून निषेध नोंदवला जात आहे. विठ्ठल दर्शनासाठी येणा-या भाविकांना चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासनाने कॉरिडॉर तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः यासाठी आग्रही आहेत. कॉरिडॉरचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांच्यावर जबाबदारी दिली आहे. त्यानुसार जिल्हाधिका-यांनी विठ्ठल मंदिर परिसरातील व्यापारी, दुकानदार आणि रहिवासांशी अनेक वेळा बैठका घेतल्या. शासनाची भूमिका त्यांना समजावून सांगितली. तरीही येथील या दुकानदाराने अशी बेताल वक्तव्य केल्याने सर्व स्तरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >