बॉलिवूड अभिनेत्री काजोल नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. कधी आपल्या चित्रपटामुळे तर कधी आपल्या वक्तव्यातून अभिनेत्री काजोल सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. अभिनेत्री काजोलच्या ‘द ट्रायल’ या वेबसीरिजचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशातच अभिनेत्रीने आपल्या हिट आणि फ्लॉप चित्रपटासंदर्भात वक्तव्य केले आहे. त्यावेळी अभिनेत्री काजोल म्हणाली की, ‘मी माझ्या प्रत्येक चित्रपटाची मालकीण आहे. ती कलाकृती हिट होऊ देत अथवा फ्लॉप’. आपल्या प्रत्येक कलाकृतीत काजोल १००% प्रतिसाद देत असते. ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ आणि ‘कभी खुशी कभी गम’सारखे चित्रपट किंवा ‘गुंडाराज’ आणि ‘हलचल’सारखे फ्लॉप चित्रपट असो. प्रत्येक चित्रपटात काजोलने जीव ओतून काम केले आहे.