Saturday, September 13, 2025

Health: साखरच नव्हे तर या पदार्थांमुळे तुमचे दात होतात खराब, वेळीच लक्ष द्या नाहीतर...

Health: साखरच नव्हे तर या पदार्थांमुळे तुमचे दात होतात खराब, वेळीच लक्ष द्या नाहीतर...
मुंबई: साखर आणि गोड पदार्थ खाल्ल्याने दातांना कीड लागते हे आपल्याला माहीत आहे. पण असे अनेक पदार्थ आहेत जे गोड नसतानाही दातांसाठी तितकेच हानिकारक असतात. हे पदार्थ दातांच्या संरक्षणासाठी असलेल्या इनॅमलला नुकसान पोहोचवतात. असे काही पदार्थ खालीलप्रमाणे 1. पांढरा ब्रेड: पांढरा ब्रेड खाल्ल्याने दातांना मोठे नुकसान होते. जेव्हा आपण ब्रेड खातो, तेव्हा त्याचे लहान कण दातांमध्ये आणि हिरड्यांमध्ये अडकतात. नंतर हे कण साखरेत रूपांतरित होतात, ज्यामुळे दातांना कीड लागण्याचा धोका वाढतो. ब्रेडच्या जागी गव्हाच्या पिठापासून बनवलेला ब्रेड खाणे अधिक चांगले मानले जाते. 2. वाईन: वाईन दातांसाठी अत्यंत हानिकारक असू शकते. लाल वाईन दातांवर डाग पाडते, तर पांढऱ्या वाईनमध्ये असलेले ऍसिड दातांचे इनॅमल खराब करते. त्यामुळे वाईन प्यायल्यानंतर लगेच पाणी पिणे किंवा दात स्वच्छ करणे महत्त्वाचे आहे. 3. एनर्जी ड्रिंक्स: एनर्जी ड्रिंक्समध्ये मोठ्या प्रमाणात साखर आणि ऍसिड असते. हे घटक दातांच्या इनॅमलसाठी अत्यंत हानिकारक आहेत आणि दातांना वेगाने खराब करतात. त्यामुळे शक्यतो एनर्जी ड्रिंक्स पिणे टाळावे. 4. सोडा/कोल्ड्रिंक्स: सोड्यामध्ये कार्बन डायऑक्साइड आणि फॉस्फोरिक ऍसिड असते. हे दोन्ही घटक दातांसाठी खूप वाईट आहेत. सोड्यामुळे दातांवरील इनॅमलचा थर हळूहळू नाहीसा होतो, ज्यामुळे दात कमजोर होतात. 5. टोमॅटो केचप: टोमॅटो केचपमध्ये साखर आणि ऍसिड दोन्ही जास्त प्रमाणात असतात. केचप खाल्ल्याने हे दोन्ही घटक दातांच्या संपर्कात येतात आणि इनॅमलला नुकसान पोहोचवतात, ज्यामुळे दातांचे आरोग्य बिघडते. 6. च्युइंग गम: साखरेने भरलेले च्युइंग गम दातांना चिकटून बसतात आणि दातांमध्ये पोकळी निर्माण करतात. जर तुम्हाला च्युइंग गम खाणे आवडत असेल, तर साखर नसलेले किंवा 'झायलीटॉल' (Xylitol) असलेले च्युइंग गम निवडावे. वरील सर्व पदार्थ दातांसाठी हानिकारक असले तरी, ते खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे
Comments
Add Comment