‘उद्यमी’चा लाभ!

कोणत्याही मोठ्या मॉलमध्ये किंवा किराणा दुकानांमध्ये, प्रकिया केलेले काजू, सोप, मिरची पावडर, विविध प्रकारचे पापड, टोमॅटो सॉस, चटण्या, मसाले लोणची अशी विविध प्रकारची उत्पादने असतात. या सर्व उत्पादनांना मोठी ग्राहकी लाभते. कृषी आधारित, प्रक्रिया उद्योग आणि व्यवसायातून रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या उत्तमोत्तम संधी निर्माण होऊ शकतात, ही बाब लक्षात घेऊन, भारत सरकारच्या “उद्यमी,” प्रकल्पांतर्गत प्रोत्साहन दिलं जातं. त्या अानुषगांने विविध प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जातात. या योजनेचा लाभ, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेंतर्गत, अर्थसाहाय्य करुन दिलं जातं. देशाच्या औद्योगिक विकासामध्ये, कृषी आधारित प्रकिया उद्योगाचा मोठा हातभार लागतो. या प्रकिया उद्योगांमध्ये कृषी, वने आणि मासोळीपासून निर्मित वस्तूंचा समावेश होतो.


प्रशिक्षण संधी :
‘उद्यमी’ प्रशिक्षण योजनेंतर्गत पुढील, कृषी आधारित अन्नप्रक्रिया उद्योगांच्या सर्वांगीण प्रशिक्षणाचा समावेश आहे - (१) मसाले तयार करण्याचा उद्योग, (२) टोमॅटो केचअप निर्मिती उद्योग, (३) टोमॅटो पुरी निर्मिती उद्योग, (४) बहुधान्य (मल्टीग्रेन) प्रकिया उद्योग आणि पॅकेजिंग, (५) काजू प्रकिया व्यवसाय, (६) किशमीश प्रकिया व्यवसाय, (७) पेठा निर्मिती व्यवसाय, (९) जिरा निर्मिती व्यवसाय, (१०) धणे पावडर निर्मिती व्यवसाय, (११) गुळपावडर निर्मिती उद्योग, (१२) काळा तांदूळ प्रकिया व्यवसाय, (१३) मिरी पावडर निर्मिती व्यवसाय, (१४) बाजरी स्वच्छता आणि प्रकिया व्यवसाय, (१५) मसाला चहा निर्मिती प्रकिया, (१६) चिकोरी प्रकिया व्यवसाय, (१७) ग्रीन टी प्रकिया व्यवसाय, (१८) रोस्टेड मखाना प्रकिया व्यवसाय, (१९) तिखट निर्मिती व्यवसाय, (२०) सोप स्वच्छता आणि प्रकिया व्यवसाय, (२१) उडीद दाळ पापड निर्मिती व्यवसाय, (२२) जिरे स्वच्छता आणि प्रकिया व्यवसाय, (२३) फळ लगदा (पल्प) प्रक्रिया व्यवसाय, (२४) सत्तू पावडर प्रक्रिया व्यवसाय.


हे उद्योग किंवा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्तींना, संबंधित उद्योग/ व्यवसायाची संपूर्ण माहिती ‘उद्यमी,’ प्रशिक्षण पोर्टलच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले जाते. या पोर्टलवरच या उद्योग आणि व्यवसायाचे, प्रशिक्षण मॉड्यूल ठेवण्यात आले आहे. खादी आणि ग्रामोद्योग विभागाच्या मार्गदर्शन सूचीनुसार प्रशिक्षण मॉड्युल तयार करण्यात आले आहेत. त्याद्वारे पुढील व्यवस्थापकीय आणि कार्यान्वयन कौशल्याचं ज्ञान प्रदान केलं जातं - (१) व्यवसाय नियोजन, (२) विपणन, (३) वित्त, (४) कार्यान्वयन, (५) निर्मिती, (६) विपणन, (७) ब्रँडिंग, (८) उद्योजकता व्यवस्थापन, (९) बँकिंग, (१०) माहिती तंत्रज्ञान आणि ऑनलाइन व्यवसाय, (११) बुककीपिंग, (१२) व्यवसायातील जोखीम आणि शास्वतता, (१३) शासकीय योजनांसाठी वैधानिक पूर्तता. प्रशिक्षणाचे व्हिडीयो इंग्रजी, हिंदी, मराठी, तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड या भाषेत उपलब्ध आहेत. अभ्यासाचे साहित्य पीडीएफ स्वरूपात उपरोक्त नमूद भाषेत उपलब्ध करून दिले जातात. मूल्यांकनसुद्धा मराठी व उपरोक्त नमूद भाषांमध्ये उपलब्ध आहे. मूल्यांकनासाठी बहुपर्यायी प्रश्नसंच असतात.


अर्थसाहाय्य :
प्रकिया उद्योगाला अर्थसाहाय्य देण्याची योजना, सूक्ष्म, मध्यम आणि लघू उद्योजकता मंत्रालयाच्यामार्फत, केंद्रिय खादी आणि ग्रामोद्योग विभागामार्फत राबवली जाते. राज्यपातळीवर, खादी आणि ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा उद्योग केंद्र आणि बँकामार्फत, ही योजना राबवली जाते. खादी व ग्रामोद्योग विभागामार्फत वित्तीय साहाय्य, नोडल बँकांद्वारे दिलं जातं. या योजनेद्वारे ग्रामीण आणि नागरी विभागात स्वयंरोजगाराची निर्मिती करण्याची क्षमता असणारे छोटे औद्योगिक घटक आणि प्रकल्पाची स्थापना व्हावी, असे अपेक्षित आहे. ग्रामीण भागातील कुशल कारागीर आणि बेरोजगार युवकांना त्यांच्याच परिसरात शास्वत स्वरूपाच्या, रोजगार संधींची निर्मिती या योजनेद्वारे केली जाते. १८ वर्षांवरील कोणत्याही इच्छुक व्यक्तीस या योजनेचा लाभ घेता येतो. त्यासाठी कोणत्याही प्रकारची उत्पनाची मर्यादा ठेवण्यात
आलेली नाही.


संपर्क - (१) हेल्पलाइन - ९११८१३३५१३५, संकेतस्थळ - <https://www.udyami.org.in/industrial-solution/agro-based-food-processing> आणि <http://support.udyami.org.in/>, (२) ईमेल- helpdesk@udyami.org.in <mailto:helpdesk@udyami.org.in>

Comments
Add Comment

हिंदूच्या भावना दुखावल्यामुळे ‘मनाचे श्लोक’ चित्रपटाला विरोध!

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत सध्या विविध सामाजिक आणि कौटुंबिक विषयांवर आधारित चित्रपटांच्या निर्मितीचा कल

'बालिका वधू'ची आनंदी विवाहबंधनात! लग्नानंतर 'सिंदूर-मंगळसूत्र' लूकमध्ये पतीसोबत दिसली

टीव्ही अभिनेत्री अविका गोर आणि मिलिंद चंदवाणी अडकले विवाहबंधनात; राष्ट्रीय टीव्हीवर होणार प्रसारण मुंबई:

'फिर से गुड न्यूज' भारती आणि हर्षने खास पोस्ट शेअर करत दिली गोड बातमी!

मुंबई : आपल्या धमाल अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी प्रसिद्ध विनोदी अभिनेत्री भारती सिंग आणि

“तुम्ही संत्री कशी खाता?” : FICCI Frames 2025 मध्ये अक्षय कुमारने फडणवीसांना विचारला गंमतीशीर प्रश्न !

मुंबई : बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार आपल्या मिश्कील शैलीसाठी प्रसिद्ध आहे. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना

‘प्रेमाची गोष्ट २'चा अनोखा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई  : 'प्रेमाची गोष्ट २' या चर्चेत असलेल्या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता आणि त्याला

आलिया भट सोबत कोण दिसणार मुख्य भूमिकेत ? विकी कौशल की रणबीर कपूर ?

लवकरच रणबीर कपूर आणि विकी कौशल एका जबरदस्त सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत . येत्या ईद ला संजय लीला