Saturday, October 25, 2025
Happy Diwali

Beed Crime : फक्त एका चुकीनं घेतला जीव! नर्तकीच्या प्रेमात अडकलेल्या माजी उपसरपंचाने संपवलं जीवन, काय घडलं त्या दोन रात्री?

Beed Crime : फक्त एका चुकीनं घेतला जीव! नर्तकीच्या प्रेमात अडकलेल्या माजी उपसरपंचाने संपवलं जीवन, काय घडलं त्या दोन रात्री?

बीड : माजी उपसरपंच गोविंद बर्गे (Govind Barge) यांच्या आत्महत्येनंतर तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्राथमिक चौकशीत असे उघड झाले की, गोविंद बर्गे यांच्यावर स्थानिक कला केंद्रात कार्यरत असलेल्या नर्तकी पूजा गायकवाड हिचा मोठा दबाव होता. मिळालेल्या माहितीनुसार, गोविंद बर्गे यांना कला केंद्रात जाण्याची सवय लागली होती. तेथे ते मोठ्या प्रमाणात पैसा उधळत असत. याच काळात त्यांची पूजा गायकवाडशी ओळख झाली. काही दिवसांतच ही ओळख प्रेमसंबंधांमध्ये रुपांतरित झाली. त्यानंतर पूजाने गोविंदकडे सतत पैसा, जमीन आणि घराची मागणी सुरू केली. पूजाचे सासुरेगाव येथील घर आधी पत्र्याचे होते. मात्र गोविंद यांनी तिच्या प्रेमासाठी ते घर बांधून दिले. एवढेच नाही तर, काही नातेवाईकांच्या नावावर प्लॉट घेण्यासाठीही पूजाने गोविंदवर दबाव टाकल्याचे उघड झाले आहे. या सर्व दबावाला कंटाळूनच गोविंद बर्गे यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी शंका तपास यंत्रणांकडून व्यक्त केली जात आहे. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

आलिशान बंगल्यावरून नर्तकी पूजाचा दबाव उघड

बर्गे यांचा गेवराई येथे एक आलिशान बंगला असून, या बंगल्यावरून नर्तकी पूजा गायकवाड सतत त्यांच्यावर दबाव टाकत होती. मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी गोविंद बर्गे यांनी पूजाला आपल्या गेवराईतील आलिशान बंगल्यावर नेले होते. पूजाने तेथे तब्बल दोन दिवस वास्तव्य केले. या काळात तिला त्या बंगल्याची ऐसपैस रचना आणि श्रीमंती फारच भावली. बंगल्याने प्रभावित झालेल्या पूजाने गोविंदला थेट सांगितले, “हा बंगला मला खूप आवडला आहे, मला तोच हवा. तू हा बंगला माझ्या नावावर कर.” सुरुवातीला गोविंद यांनी पूजाच्या या मागणीला थोडक्यात दुर्लक्ष केले. मात्र त्यानंतर पूजा सातत्याने याच मागणीसाठी गोविंद यांच्यावर तीव्र दबाव टाकू लागली. पोलिस तपासात उघड झाले आहे की, बंगल्याच्या मालकीसाठी झालेला हा दबावदेखील गोविंद बर्गे यांच्यावर मानसिक ताण वाढवणारा ठरला असावा. त्यामुळेच त्यांनी आत्महत्येचा मार्ग निवडला असावा, अशी शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे.

गोविंद बर्गेचा ठाम नकार, तरीही नर्तकी पूजाचा हट्ट कायम

नर्तकी पूजाने वारंवार दबाव आणल्यानंतर गोविंद बर्गे यांनी तिला स्पष्ट शब्दांत उत्तर दिले होते. त्यांनी ठामपणे सांगितले, “हा बंगला मी तुझ्या नावावर करू शकत नाही. कारण याबाबत माझ्या वडिलांना आणि घरच्यांना माहिती आहे. गावकऱ्यांच्या नजरेत माझी अब्रू जाईल. म्हणून मी तुला हा बंगला देऊ शकत नाही. मात्र, तुला हाच बंगला नको असल्यास, मी तुला याच्यासारखा दुसरा बंगला बांधून देतो.” गोविंद यांचा हा नकार जाहीर स्वरूपात ठाम होता. तरीसुद्धा पूजाने आपला तगादा कायम ठेवला. तिने सातत्याने त्यांच्यावर दडपण आणत राहिले. या वाढत्या दबावामुळेच गोविंद मानसिक तणावात होते, असे पोलिसांच्या तपासात समोर येत आहे.

बंगला न मिळाल्याने नर्तकीचा संताप

पूजाने केलेल्या जवळपास सर्व मागण्या गोविंदने पूर्ण केल्या होत्या. जमीन, पैसे, घर यांसारख्या अनेक गोष्टींसाठी त्यांनी उदारपणे हात पुढे केला. पण गेवराईतील आलिशान बंगला आपल्या नावावर करून घेण्याच्या पूजाच्या हट्टाला मात्र गोविंदने ठाम नकार दिला. यामुळे नर्तकी पूजाचा संताप अनावर झाला. तिने गोविंदसोबत बोलणं थांबवलं. एवढंच नव्हे, तर त्यांचे फोन कॉल्स घेणंही तिने बंद केलं. या अचानक बदललेल्या वागण्यामुळे गोविंद अधिक अस्वस्थ झाले. शेवटी त्यांनी थेट पूजाच्या गावी जाऊन तिच्या आईला भेटण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पूजा कला केंद्रात व्यस्त होती. मात्र, तिच्या आईकडूनही कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. अपमान, तगादा आणि तुटलेले संबंध यांच्या छायेत, मानसिकदृष्ट्या खचलेल्या गोविंद बर्गे यांनी शेवटी टोकाचा निर्णय घेतला. त्यांनी स्वतःवर गोळी झाडून जीवनयात्रा संपवली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा