Friday, September 12, 2025

अभिनेत्री करिश्माने मारली चालत्या लोकलमधून उडी

अभिनेत्री करिश्माने मारली चालत्या लोकलमधून उडी

मुंबई : लोकप्रिय अभिनेत्री करिश्मा शर्मा हिचा मुंबईतील चर्चगेट येथे अत्यंत गंभीर अपघात झाला. करिश्मा स्वतःने सोशल मिडियावर हा धक्कादायक किस्सा शेअर करत घटनाक्रम स्पष्ट केला आहे. तिने इंस्टाग्राम स्टोरीत सांगितले की, शूटिंगसाठी चर्चगेटकडे जाताना साडी नेसून लोकल ट्रेन पकडण्याचा निर्णय घेतला. मात्र तिच्या मित्र-मैत्रिणींना ट्रेन पकडायला जमले नाही. त्यामुळे करिश्माने धावत ट्रेनमधून उडी मारली आणि त्या दरम्यान ती पडली.

करिश्माच्या म्हणण्यानुसार, या अपघातामुळे तिला डोक्याला गंभीर दुखापत झाली असून पाठीवरही मार लागला आहे. तिला डोक्याला सूज आले असून डॉक्टरांनी तिला एमआरआय करण्याचा सल्ला दिला आहे. करिश्माने आपल्या फॉलोअर्सना सांगितले की, “कालपासून मला प्रचंड त्रास होतो आहे, पण मी धैर्य राखले आहे. माझ्यासाठी प्रार्थना करा.”

करिश्माच्या मैत्रिणीने देखील एक व्हिडीओ शेअर केला असून तिने लिहिले आहे की, “माझ्या मैत्रिणीला ट्रेनमधून पडलेले पाहून आम्ही तिला त्वरित हॉस्पिटलमध्ये नेले. सध्या तिला काही आठवत नाही. आम्ही तिच्या लवकर बरे होण्याची प्रार्थना करतो.”

करिश्मा शर्मा कोण आहे?

करिश्मा शर्मा ही एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे जिने ‘रागिणी एमएमएस रिटर्न्स’, ‘प्यार का पंचनामा’, ‘उजडा चमन’, ‘एक व्हिलन रिटर्न’ आणि ‘फिक्सर’ या सिनेमांमध्ये महत्वाची भूमिका साकारली आहे. तिच्या कामगिरीने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे.

करिश्माच्या प्रकृतीबाबत अद्याप अधिक माहिती समोर आलेली नाही, मात्र तिच्या प्रेक्षकांनी आणि चाहत्यांनी तिला लवकर बरी व्हावे, अशी प्रार्थना केली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >