Thursday, September 11, 2025

Vice President : राधाकृष्णन शुक्रवारी घेणार उपराष्ट्रपती पदाची शपथ

Vice President : राधाकृष्णन शुक्रवारी घेणार उपराष्ट्रपती पदाची शपथ

नवी दिल्ली : नवनिर्वाचित उपराष्ट्रपती सी.पी. (चंद्रपुरम पोन्नुसामी) राधाकृष्णन यांचा शपथविधी समारंभ शुक्रवार, १२ सप्टेंबर रोजी सकाळी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राधाकृष्णन यांना पदाची शपथ देतील. या समारंभासाठी एनडीएच्या वरिष्ठ नेत्यांना निमंत्रणे पाठवली आहेत. यामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक देशभरातील अनेक नेत्यांचा समावेश आहे.

मंगळवारी एनडीएचे उमेदवार राधाकृष्णन यांची भारताचे १५ वे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली. त्यांना ४५२ मते मिळाली, तर विरोधी पक्षाचे उमेदवार आणि सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी यांना ३०० मते मिळाली.

Comments
Add Comment