Thursday, September 11, 2025

युपीआय व्यवहार ऑगस्ट महिन्यात २० अब्ज पार 'या' कारणामुळे Phone Pe नंबर १

युपीआय व्यवहार ऑगस्ट महिन्यात २० अब्ज पार 'या' कारणामुळे Phone Pe नंबर १

प्रतिनिधी:ऑगस्ट महिन्यात युपीआय (Unified Payment Interface UPI) व्यवहार २० अब्जाहून अधिक संख्येवर पोहोचले आहेत. नव्या आकडेवारीनुसार, प्रथमच एका महिन्यात इतक्या मोठ्या प्रमाणात युपीआय व्यवहारात वाढ झाली आहे. एनपीसीआय (National Payments Corporation of India NPCI) ने ही नवी आकडेवारी जाहीर केली. त्यांच्या माहितीनुसार, २४.८५ लाख कोटी मूल्यांकनाचे व्यवहार युपीआयच्या माध्यमातून झाले आहेत.

सर्वाधिक व्यवहार फोन पे (Phone Pay), त्यानंतर गुगल पे (Google Pay), मग अनुक्रमे पेटीएम यांचा क्रमांक लागला आहे. सर्वाधिक व्यवहार फोन पे कडून (९.६ अब्ज) झाले असून गुगल पे कडून (७.५ अब्ज) व पेटीएम कडून (१.६ अब्ज) व्यवहार अनुक्रमे झाले. एकूण युपीआय व्यवहारातील मार्केट शेअरमध्ये सर्वाधिक जागा फोन पे ची ४८.६४% असून त्यानंतर गुगल पे ची ३५.५३% व पेटीएम कडून ८.५% आहे.

अहवालातील माहितीनुसार, वाढत्या आर्थिक दैनंदिन कामकाजासाठी होणारे आर्थिक व्यवहार, व दैनंदिन गरजेच्या वस्तूंची खरेदी विक्री यामुळे ही वाढ मोठ्या झाली आहे. डेट व सिक्युरिटीजसाठी झालेल्या आर्थिक व्यवहार पाहिल्यास त्यामध्ये सर्वाधिक वाढ झा ली आहे जी जवळपास ७७००७ कोटी रुपये आहे. केवळ ऑगस्ट महिन्यात एकूण युपीआय व्यवहार ६४५ दशलक्षाच्या पटीत झाले. ग्राहक खर्च (Consumer Expenditure) पाहिल्यास केवळ ग्रोसरी, सुपरमार्केटमधील खरेदी ६८११६ कोटींवर पोहोचली आहे. तसेच इतर श्रेणीतील व्यवहारातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली.

Comments
Add Comment