
मुंबई:टीव्हीएस मोटर कंपनी (टीव्हीएसएम) दुचाकी आणि तीन चाकी क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीने आज TVS NT ORQ 150 ही भारतातील वेगवान हायपर स्पोर्ट स्कूटर लाँच केली आहे.'१४९.७ cc रेस- ट्युन्ड इंजिन आणि स्टेल्थ एयरक्राफ्ट डिझाइनपासून प्रेरित असलेल्या या स्कूटरमध्ये उच्च कामगिरी, स्पोर्टी लूक आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान यांचा मेळ घालण्यात आला आहे' असे कंपनीने लाँच दरम्यान नमूद केले आहे. नव्या पिढीच्या रायडर्ससाठी खास बनवण्यात आलेली ही स्कूटर ११९००० रुपयांच्या प्रारंभिक किंमतीत (एक्स शोरूम, ऑल इंडिया) उपलब्ध करण्यात आली आहे.TVS NTORQ चा वारसा (Legacy) पुढे नेणारी ही स्कूटर नवा आयकॉन बनवण्यासाठी सज्ज असल्याचे कंपनीने म्हटले. यातील MULTIPOINT® प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, एयरोडायनॅमिक विंगलेट्स, कलर्ड अलॉय व्हील्स, सिग्नेचर मफलर नोट या स्कूटरची रेसिंगची क्षमता दर्शवणारी आहे.
अलेक्सा, स्मार्टवॉच इंटिग्रेशन, लाइव्ह इंटिग्रेशन, नॅव्हिगेशन आणि इतर ओटीए अपडेट्ससह ५०+ स्मार्ट वैशिष्ट्यांचा समावेश असलेल्या या हाय- रेझ टीएफटी क्लस्टरमुळे ही स्कूटर या श्रेणीतील आधुनिक ठरणार असून ग्राहकांसाठी एकप्रकारे पर्वणी असेल.
या लाँचविषयी टीव्हीएस मोटर कंपनीच्या कम्युटर आणि ईव्ही व्यवसाय विभागाचे प्रमुख, कॉर्पोरेट ब्रँड आणि मीडिया विभागाचे अध्यक्ष तसेच वरिष्ठ उपाध्यक्ष अनिरूद्ध हलदार म्हणाले आहेत की,‘दोन दशलक्ष NTORQians ५० सेल्फ मॅनेज्ड रायडर ग्रुप्स व कम्युनिटीजच्या सहकार्याने भारतातील सर्वात प्रसिद्ध ऑटोमोटिव्ह ब्रँड्सपैकी एक असलेला हा ब्रँड व रायडर्सचे नाते तयार झाले आहे. TVS NTORQ आकर्षक डिझाइन, दर्जेदार कामगिरी व नव्या युगातील तंत्रज्ञानासह सुसज्ज आहे. नवीन TVS NTORQ 150 जेन झीच्या उच्च कामगिरीच्या बदलत्या अपेक्षा पूर्ण करणारी आहे. TVS NTORQ 150 ही भारतातील पहिली हायपर स्पोर्ट स्कूटर तिचे हायपर फ्युचरिस्टिक डिझाइन, हायपर ट्युन्ड कामगिरी आणि हायपर कनेक्टेड टेक रायडर्सना थरार अनुभ व ता येईल. यातून TVS NTORQ ब्रँड फ्रँचाईझी मजबूत होण्यास तसेच तिचा विस्तार होण्यास मदत होईल.’
उत्पादन कामगिरी - (Product Performance Specifications)-
TVS NTORQ 150 मध्ये 149.7cc, एयरकूल्ड, O3CTech इंजिन बसवण्यात आले आहे, जे १३.२ PS ७००० rpm वर आणि १४.२ Nm टॉर्क ५५०० rpm वर देते. 0–60 km/h पासून केवळ ६.३ सेकंदांत अक्सलरेशन होते आणि १०४ km/h, चा सर्वोच्च वेग मिळतो. पर्यायाने ही या श्रेणीतील सर्वात जलद स्कूटर ठरली आहे.
स्पोर्टी आणि भविष्यवेधी डिझाइन - (Futuristic Design)
स्टेल्थ एयरक्राफ्टपासून प्रेरणा घेऊन बनवण्यात आलेल्या TVS NTORQ 150 मध्ये MULTIPOINT® प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, स्पोर्टी टेल लॅम्प्स, एयरोडायनॅमिक डिझाइन सिग्नेचर साउंडसह स्टबी मफलर, नेकेड हँडलबार आणि कलर्ड अलॉय व्हील्स देण्यात आले आहे.
फॉरवर्ड (Forward) -
बायस्ड स्टान्स लाँच- रेडी पॉइजसह
• अरोहेड फ्रंट फॉर्ण एयरोडायनॅमिक कार्यक्षमता आणि व्हिज्युअल वेगासह
• नेकेड मोटरसायकल स्टाइल हँडलबार, रायडर कंट्रोल आणि मिळतो कनेक्टेड फील
• जेट- इन्स्पायर्ड व्हेंट्स आणि इंटिग्रेटेड विंगलेट्ससह रेस आयडेंटिटी आणखी ठळक
• MULTIPOINT® प्रोजेक्टर हेडलॅम्प्ससह अधिक चांगली प्रकाशयोजना
• सिग्नेचर ‘T’ टेल लॅम्प, वैशिष्ट्यपूर्ण आणि सुधारित दृश्यमानता (Visibility) देणारा
• गेमिंग कन्सोलपासून प्रेरित हायरेज टीएफटी
• स्पोर्ट ट्युन्ड सस्पेन्शन, लाइटवेट अलॉय आणि स्पोर्टी व्यक्तिमत्त्व ठळक करणारे परफॉर्मन्स एक्झॉस्ट
नव्या युगाच्या रायडर्ससाठी आधुनिक वैशिष्ट्ये -
हायरेझ टीएफटी क्लस्टर आणि टीव्हीएस
कंपनीच्या दाव्यानुसार, स्मार्टएक्सकनेक्टसह सुसज्ज असलेल्या TVS NTORQ 150 मध्ये अलेक्सा, स्मार्टवॉच इंटिग्रेशन, टर्न-बाय- टर्न नॅव्हिगेशन, व्हिईकल ट्रॅकिंग, लास्ट पार्क्ड लोकेशन, कॉल/मेसेजेस/सोशल मीडिया अलर्ट्स, राइड मोड्स, ओटीए अपडेट्स आणि कस्टम विजेट्ससह ५० पेक्षा जास्त कनेक्टेड वैशिष्ट्ये. अडॅप्टिव्ह टीएफटी डिस्प्ले, ४ वे नॅव्हिगेशन स्विच आणि इंटिग्रेटेड टेलिमॅटिक्ससह हा भारतातील सर्वात आधुनिक स्कूटर इंटरफेज ठरला आहे.
सुरक्षा आणि आरामदायीपणा- (Security and Comfort)
ही स्कूटर एबीएस आणि ट्रॅक्शन कंट्रोलसह (या सेगमेंटमध्ये पहिल्यांदाच), अपघात आणि चोरीविषयक अलर्ट्स, हझार्ड लॅम्प्स, इमरजन्सी ब्रेक वॉर्निंग आणि फॉलो मी हेडलॅम्प्स देत रायडरचा आत्मविश्वास वाढवते. टेलिस्कोपिक सस्पेन्शन, अडजस्टेबल ब्रेक लि व्हर्स, पेटंटेड ई- झेड सेंटर स्टँड आणि सीटखाली २२ लीटरचे स्टोअरेजमुळे चांगला आरामदायीपणा मिळतो.
उपलब्ध रंग -
TVS NTORQ 150 दोन व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध करण्यात आली आहे -
TVS NTORQ 150 – स्टेल्थ सिल्व्हर, रेसिंग रेड, टर्बो ब्लू
TVS NTORQ 150 टीएफटी क्लस्टरसह – नायट्रो ग्रीन, रेसिंग रेड आणि टर्बो ब्लू या रंगात उपलब्ध आहे.