
पुणे : जगातील पहिली फ्रँचायझी-आधारित सुपरक्रॉस रेसिंग लीग म्हणून ओळखली जाणारी इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगने (आयएसआरएल) अभिमानाने हैदराबादला राऊंड २ साठी अधिकृत यजमान शहर म्हणून जाहीर केले. या कार्यक्रमात अधिकृतरीत्या घोषणा करण्यात आली की आयएसआरएल सीजन २ मधील हैदराबाद फेऱ्यांचे आयोजन जीएमसी बालयोगी अॅथलेटिक स्टेडियम, गाचीबोवली येथे होणार आहे. यामुळे राज्यातील मोटरस्पोर्ट्सविषयी वाढता उत्साह आणि जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा तसेच युवकाभिमुख क्रीडा उपक्रमांसाठी सरकारची कटिबद्धता अधोरेखित झाली आहे. हैदराबाद फेरीत २०,००० हून अधिक प्रेक्षक मैदानावर उपस्थित राहतील आणि लाखो लोक टीव्ही, ओटीटी व डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर पाहतील. त्यामुळे ISRL ची भारतातील अग्रगण्य क्रीडा आणि मनोरंजन स्पर्धा म्हणून ओळख अधिक मजबूत होईल.
पुणे हे आपल्या उत्साही युवा संस्कृती व क्रीडा पर्यावरणासाठी ओळखले जाते आणि आयएसआरएलच्या कार्यप्रणालीचे केंद्र व नवोपक्रमांचे हब म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका निभावत आहे. तर हैदराबादसारखी शहरे दाखवून देतात की राज्यस्तरीय भागीदारीमुळे विस्ताराची गती वाढू शकते आणि टिकाऊ मालमत्ता तसेच मनोरंजन क्षेत्राचा विकास साधता येतो. अनेक राज्यांमध्ये लीगचा विस्तार होत असल्याने भारतातील मोटरस्पोर्ट्स इकोसिस्टमच्या वाढीचा स्पष्ट संकेत मिळत आहेत. याचा योग्य उपयोग सरकार आणि खासगी क्षेत्राकडून मिळणाऱ्या पाठिंब्यामुळे साधता येईल.
या कार्यक्रमात आयएसआरएल हेल्मेटचा सांकेतिक हस्तांतरण सोहळा आणि पोस्टरचे अनावरण करण्यात आले. यामधून राज्यातील क्रीडा परिसंस्था मजबूत करण्यासाठी लीग आणि राज्य सरकार यांच्यातील दृढ सहकार्याचे प्रतीक अधोरेखित झाले. या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यात श्री. ए. पी. जितेंद्र रेड्डी (माजी खासदार, नवी दिल्लीतील तेलंगणा सरकारचे विशेष प्रतिनिधी व सल्लागार), श्री. सतीश गौड (खजिनदार, तेलंगणा ऑलिम्पिक असोसिएशन) यांचा समावेश होता. यावेळी एन. गौतम (सह-मालक, बिग रॉक मोटरस्पोर्ट्स एसएक्स फ्रँचायझी टीम, इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग) आणि ईशान लोखंडे (सह-संस्थापक, इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग) देखील उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय दर्जाचे मान्यताप्राप्त मोटरस्पोर्ट्स तेलंगणामध्ये आणण्यासाठी आयएसआरएलने बजावलेल्या भूमिकेचे कौतुक करताना क्रीडा मंत्री श्री. वक्कटी श्रीहरी म्हणाले,“तेलंगणा नेहमीच युवकांच्या सबलीकरणासाठी जागतिक दर्जाच्या क्रीडां प्रकारांची आणि प्रशिक्षण संधींची निर्मिती करून खेळाला प्रोत्साहन देत आले आहे. जीएमसी बालयोगी अॅथलेटिक स्टेडियम हे अत्याधुनिक सुविधा असलेले ठिकाण आहे, जिथे खेळाडूंची स्वप्ने साकार होतात आणि खेळाडू जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यासाठी तयार होतात. मोटरस्पोर्ट्स हा असा क्रीडा प्रकार आहे ज्यामध्ये स्पर्धात्मकतेमुळे खेळाडूंच्या स्वभावाचा विकास, सहनशीलता आणि व्यक्तिगत प्रगती घडते. अशा आंतरराष्ट्रीय स्तरावरील लीग्ससाठी तेलंगणाचे दरवाजे उघडून आम्ही विविध संधी निर्माण करत आहोत, रोजगार वाढवत आहोत आणि आमच्या गुंतवणुकींची दीर्घकालीन शाश्वतता निश्चित करत आहोत. या व्यासपीठांमुळे युवकांच्या आकांक्षा प्रज्वलित होतात, उत्कृष्टतेची संस्कृती वाढते आणि भारत तसेच हैदराबाद जागतिक क्रीडा नकाशावर ठामपणे उभे राहतात.”
आयएसआरएलचे सह-संस्थापक ईशान लोखंडे म्हणाले, “ही घोषणा या प्रदेशातील आमच्या स्वीकाराची आणि मोटरस्पोर्ट्सविषयी असलेल्या खोलवरच्या आवडीची साक्ष देते. तेलंगणा सरकार आणि एसएटीएसकडून मिळालेला पाठिंबा त्यांच्या उत्साही क्रीडा संस्कृती निर्माण करण्याच्या दृष्टीकोनाचे प्रतिबिंब आहे. आयएसआरएलच्या माध्यमातून आम्ही अनेक राज्यांमध्ये उल्लेखनीय क्रीडा आणि मनोरंजनाच्या संधी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत, ज्यामुळे युवक प्रेरित होतील. फक्त रेसिंगपुरते मर्यादित न राहता, आयएसआरएल हे खेळाडूंना पुढे जाण्याचे मार्ग दाखवणारे व्यासपीठ आहे, पुढच्या पिढीला प्रेरणा देणारे आणि भारतातील जागतिक दर्जाचे पायाभूत सुविधा खऱ्या अर्थाने जागतिक दर्जाच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करू शकतात हे सिद्ध करणारे आहे.”
टर्फ आणि ट्रॅकच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन, आयएसआरएल हे सुनिश्चित करते की जीएमसी बालयोगी स्टेडियमसारखी ठिकाणे कार्यक्रमानंतर कोणत्याही अडथळ्याविना पुन्हा पूर्ण क्षमतेने वापरली जाऊ शकतात. हे मॉडेल क्रीडा पायाभूत सुविधांकडे फक्त खर्चाचे केंद्र म्हणून न पाहता, दीर्घकालीन महसूल निर्माण करणारे साधन म्हणून बघते, ज्याचा फायदा सरकार आणि खासगी भागधारक या दोघांनाही होतो. हैदराबादला यजमान शहरांच्या यादीत समाविष्ट करून, आयएसआरएल आपला विस्तार वाढवत आहे, तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा, खेळाडूंचे कल्याण आणि चाहत्यांचा अनुभव या सर्व बाबींमध्ये मानके टिकवून ठेवत आहे.