
मोहित सोमण:आज पब्लिक सेक्टर बँकांच्या शेअर्समध्ये मोठी रॅली झाली आहे. प्रामुख्याने जीएसटी दरकपातीनंतर ग्राहक उपयोगी वस्तूंच्या उपभोगात सातत्याने वाढ होत आहे. अशातच ग्राहकांच्या बचतीतही वाढ होत आहे ज्या कारणामुळे आगामी काळात बँकांमध्ये व सिक्युरिटीज मध्ये गुंतवणूकीत वाढ होण्याची शक्यता असल्याने पीएसयु शेअर मोठ्या पातळीवर आज वाढले. सलग दुसऱ्यांदा क्रेडिट वाढीमुळे बँकेच्या शेअर्समध्ये वाढ झाली विशेषतः पीएसयु बँकांच्या शेअर्समध्ये आणखी वाढ झाली. आज सकाळी सत्राच्या सुरुवातीला निफ्टी पीएसयु बँक शेअर १.०३% उसळले असून निफ्टी ५० हा केवळ ०.०६% उसळला होता. दुपारी ३.२२ वाजेपर्यंत पीएसयु बँकेच्या निर्देशांकात ०.८२% वाढ झाली असून बँक निफ्टीत ०.२७%, निफ्टी ५० मध्ये ०.१५% वाढ झाली आहे.
गेल्या गेल्या दोन सत्रामध्ये विचार केल्यास बेंचमार्क निर्देशांकात ०.५ टक्के वाढ झाली होती, तर पीएसयू बँक निर्देशांक ३.४% आहे.निर्देशांकाने ७,१४२.२५ चा इंट्राडे उच्चांक देखील गाठला आहे जो जुलै २०२५ च्या सहामाहीत ७,३०४.८० या ५२ आठवड्यांच्या उ च्चांकापेक्षा सुमारे २.३% पेक्षा खाली आला आहे.
पीएसयु शेअर वाढण्यामागे आणखी कुठला 'ट्रिगर' जबाबदार?
केअर एज रेटिंग्जच्या आकडेवारीनुसार, सलग तीन तिमाहीत पीएसबींनी कर्ज घेण्याच्या बाबतीत खाजगी क्षेत्रातील बँकांना (पीव्हीबी) मागे टाकले आहे. त्यांचे क्रेडिट-टू-डिपॉझिट (CD) गुणोत्तर अधिक स्थिर राहिले आहे, ज्यामुळे पीएसबींना कर्ज देण्यास अधि क व्यापक जागा मिळाली. आर्थिक वर्ष २६ च्या पहिल्या तिमाहीत, पीएसबींनी बाजारातील ५३.८% हिस्सा ताब्यात ठेवला होता, जो वर्षानुवर्षे ५५ बेसिस पूर्णांकाने वाढला होता, तर खाजगी बँकांनी ५८ बेसिस पूर्णांकाने गमावला.पीएसबीने किरकोळ, कृषी आणि एमएसएमई विभागातही मोठ्या प्रमाणात विस्तार सुरू ठेवला असून त्यांच्या मोठ्या व विस्तृत शाखा नेटवर्क आणि सरकारी योजनांच्या प्रवाहाचा फायदा होत आहे. मार्च २०२० पासून, पीएसबींच्या ठेवींमध्ये ४७.५ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे, जी खाजगी बँकांसाठी ४२.४ लाख कोटी रुपयांच्या वाढीपेक्षा थोडी जास्त आहे.
आज शेअर बाजाराच्या दोन्ही सत्रांच्या दृष्टीने एसबीआय, पंजाब बँक, युको बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया अशा पीएसयु बँकेच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे.