Thursday, September 11, 2025

Picadily Agro शेअर १२.३६% उसळत अप्पर सर्किटवर ! पाच वर्षांत शेअरमध्ये ६६८६.१४% वाढ

Picadily Agro शेअर १२.३६% उसळत अप्पर सर्किटवर ! पाच वर्षांत शेअरमध्ये ६६८६.१४% वाढ

मोहित सोमण: पिकाडीली अँग्रो (Piccadilly Agro Limited) कंपनीचा शेअर आज दुपारी २.३६ वाजेपर्यंत १२.३६% उसळला आहे. सकाळच्या सत्रात सुरुवातीलाच कंपनीचा शेअर ७% हून अधिक पातळीवर उसळला होता. गेल्या तीन दिवसात कंपनीचा शे अर मोठ्या प्रमाणात उसळल्याने आज ६९३ रूपये प्रति शेअर इंट्राडे उच्चांकावर (All time High) पोहोचला आहे. आकडेवारीनुसार इयर टू डेट गुणोत्तरात कंपनीचा शेअर घसरला असला तरी गेल्या ४ ते ५ वर्षात कंपनीने अभूतपूर्व (Exponential) वाढ नोंद वली आहे. इयर टू डेट वाढीत -१९.४% घसरण शेअरने नोंदवली असली तरी कंपनीचा शेअर ५२ आठवड्यातील उच्चांकावर म्हणजेच ७४४ रुपये प्रति समभागावर (Stock) वर पोहोचला आहे.

काल कंपनीच्या संचालक मंडळाने (Board of Directors) २८.४९ लाख मूल्यांकनाचे सीसीडी (Compulsory Convertible Debentures CCD) चे इक्विटी शेअर्समध्ये रूपांतरण करण्यास मान्यता दिली. कंपनीचे सध्या बाजार भांडवल (Market Capitalis ation) १७५ कोटी रुपये आहे. कंपनी प्रामुख्याने डिस्टिलरी, माल्ट स्पिरीट मद्य उत्पादनात आहे. आज शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असली तरी इयर टू डेट बेसिसवर कंपनीच्या शेअर्समधील मूल्यांकनात १९% घसरण झाली.बाजाराच्या व्यापक संद र्भात, नकारात्मक सुरुवातीनंतर सेन्सेक्समध्ये सुधारणा दिसून आली, सध्या तो ०.०६% ने वाढून ८१,४७४.५७ वर व्यवहार करत आहे. स्मॉल-कॅप शेअर्स बाजारात आघाडीवर आहेत, बीएसई स्मॉल कॅप इंडेक्स ०.२८% ने वाढला आहे.

अलीकडील शेअर वाढीनंतरही पिकाडिली अ‍ॅग्रोची वर्षभरातील कामगिरी २४.१२% ने घसरली आहे जी सेन्सेक्सच्या ४.२८% वाढीच्या तुलनेत घसरली आहे. तथापि, या शेअरने उल्लेखनीय दीर्घकालीन वाढ दर्शविली आहे, गेल्या तीन वर्षांत आश्चर्यकारक १६५३. ८ ८% वाढ आणि गेल्या पाच वर्षांत प्रभावी ६६८६.१४% वाढ झाली आहे.

Comments
Add Comment