
राज्यातील १७ जिल्ह्यांना अतिमुसळधारेचा इशारा तर २० राज्यांना आठवडाभर पाऊस झोडपणार
मुंबई (प्रतिनिधी): दोन दिवसांपूर्वी राज्यभरात पावसाने जोरदार हजेरी लावली. मात्र त्यानंतर पावसाने काहीशी विश्रांती घेतली असून काही ठिकाणी पावसाची रिपरिप सुरु असलयाचे दिसून येत आहे. यामुळे वातावरण ढगाळ राहत असून नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळत आहे. मात्र अशातच आता २० राज्यांना हवामान विभागाने अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रासह अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, छत्तीसगड, बिहार, उत्तराखंड, गुजरात, तामिळनाडू अशा भागात मुसळधार पावसाच्या सरी कोसळणार असल्याचे म्हटले आहे. पुढील आठवडाभर २० राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याचे अंदाज वर्तवण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्यातील १७ जिल्ह्यांना १३ ते १८ सप्टेंबर या कालावधीत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने दिलेल्या या इशार्यानुसार मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यांसह रायगड, कोल्हापूर, सांगली, सातारा, अहमदनगर, लातूर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली आणि यवतमाळ या जिल्ह्यात अतिवृष्टीचा फटका बसू शकतो असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे, तर नदीकाठच्या भागात राहणाऱ्या नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या पावसामुळे पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने आवश्यक ती काळजी घेण्यास सांगण्यात आले आहे.
राजधानी दिल्लीत मुसळधार पावसानंतर दिल्लीकरांना पुन्हा एकदा उष्णतेच्या झळा सोसाव्या लागत आहेत. सध्या यमुना नदीच्या पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे. दिल्लीत आता पुन्हा एकदा दमट उष्णतेचे वातावरण आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आजपासून येत्या तीन-चार दिवसांत दिल्लीत पारा वाढण्याची आणि उष्णता वाढण्याची शक्यता आहे. तर उत्तर प्रदेश-बिहारमध्ये मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज आहे. ११ सप्टेंबरपासून उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कालावधी सुरू होण्याची शक्यता आहे. तर १३ सप्टेंबरपर्यंत बिहारमध्ये हलका ते मुसळधार पाऊस पडू शकतो. पुढील दोन-तीन दिवस पंजाबला पावसापासून दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
ईशान्य भारत
१० ते १६ सप्टेंबर दरम्यान अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालय आणि नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा येथे काही ठिकाणी हलका, मध्यम पाऊस, गडगडाटी वादळ आणि काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
१२ ते १६ सप्टेंबर दरम्यान अरुणाचल प्रदेश आणि नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा येथे जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तर १३ ते १६ सप्टेंबर दरम्यान आसाम आणि मेघालय.
पूर्व आणि मध्य भारत
१० रोजी पश्चिम मध्य प्रदेशात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस/गडगडाटी वादळ आणि काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. १० आणि ११ सप्टेंबर रोजी अंदमान आणि निकोबार बेटे आणि पूर्व मध्य प्रदेश येथे पावसाचा अंदाज आहे. १० ते १४ सप्टेंबर दरम्यान छत्तीसगड आणि बिहार १० ते १५ तारखेला उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीम १२ ते १४ सप्टेंबर रोजी विदर्भ ११ आणि १२ सप्टेंबर रोजी ओडिशा १० आणि १३ रोजी उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीम येथे काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर ११ सप्टेंबर रोजी बिहार, झारखंड आणि ओडिशा येथे पावसाची शक्यता आहे.
वायव्य भारत
११, १२, १५ आणि १६ रोजी पूर्व उत्तर प्रदेशात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस/गडगडाटी वादळ १२ रोजी पश्चिम उत्तर प्रदेश १३ रोजी जम्मू-काश्मीर १३ आणि १४ रोजी हिमाचल प्रदेश १२-१५ सप्टेंबर दरम्यान उत्तराखंडमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस/गडगडाटी वादळ १२-१६ सप्टेंबर दरम्यान मध्य महाराष्ट्र १२-१४ दरम्यान मराठवाडा १३-१६ दरम्यान कोकण आणि गोवा १४-१६ सप्टेंबर दरम्यान गुजरात प्रदेश
१४ सप्टेंबर रोजी कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दक्षिण द्वीपकल्पीय भारत
१० आणि ११ तारखेला तामिळनाडू १० तारखेला केरळ आणि माहे, दक्षिण अंतर्गत कर्नाटकात १० ते १३ तारखेला आंध्र प्रदेश आणि यानम आणि तेलंगणा १० ते १४ सप्टेंबर दरम्यान उत्तर अंतर्गत कर्नाटकात अनेक/काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस/गडगडाटी वादळ आणि सोसाट्याचा वारा (ताशी ३०-४० किमी वेगाने) मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पुढील ५ दिवसांत आंध्र प्रदेश आणि यानम आणि रायलसीमा येथे जोरदार वारे (ताशी ३०-४० किमी वेगाने) वाहण्याची शक्यता आहे.