
मोहित सोमण: रूपयात आज निचांकी घसरण झाली आहे. युएस डॉलरच्या तुलनेत रुपयात मोठी घसरण सुरू असल्याने आज रूपयाची दरपातळी ८८.४५ रूपये प्रति डॉलरवर गेली. त्यामुळे रूपयात गेल्या आठवड्यात मोठा दबाव निर्माण झाल्याने आज रूप या घसरणीसह मूलभूत पातळी राखण्यास अपयशी ठरला. परिणामी ही निचांकी (All time Low) घसरण झाली.सध्या आशियाई बाजारातील करन्सीसह डॉलरच्या तुलनेत रूपयांवर दबाव सुरू आहे. फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात होईल या आशेने मोठ्या प्रमाणात डॉलर वाढतो आहे. याशिवाय सोन्याच्या दरातही मोठी चढउतार सुरू असल्याने भारतीय कमोडिटीवरही सातत्याने दबाव निर्माण होत आहे. अशातच कालचा अपवाद वगळता आठवड्यात रूपयाची घसरण झाली . त्याचाच परिपाक म्हणून आज आण खी निचांकी घसरण झाली. फेड व्याजदरात कपातीच्या आशेने दुसरीकडे मोठ्या प्रमाणात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (Foreign Institutional Investors FII) ने आपली गुंतवणूक काढून मोठ्या प्रमाणात काढण्यास सुरूवात केल्याने आणखी रूपयां वर दबाव वाढला. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, या वर्षात एफआयआयने ११.०७ अब्ज डॉलरची रोख गुंतवणूक बाजारातून काढली. दुसरीकडे व्यापारी व व्यवसायिकांवर टॅरिफचा दबाव वाढत असल्याने सरकारने एकीकडे युएस व भारत यांच्या तील बोलणीस पुन्हा सुरूवात केली असून निर्यातदारांना दिलासा देण्यासाठी विशेष प्रोत्साहन योजना राबविण्यास सुरुवात केली आहे असे असले तरी काही क्षेत्रीय बाजारपेठेत नुकसान झाल्याने रूपयांची मागणी कमी होत आहे. अशा एकत्रित कारणांमुळे आज रूपयात मोठ्या पातळीवर घसरण झाली.