
प्रतिनिधी:असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया (AMFI) ने आपली नवी आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार ऑगस्ट महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंड आवक (Inflow) घटली आहे. जु लै महिन्यात आवक ४२७०२ कोटी रूपये होती जी ऑगस्ट महिन्यात २२% घसरत ३३४३० कोटींवर पोहोचली आहे. इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) विचार केल्यास १३% घसरण ऑगस्टमध्ये झा ली. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात ही आवक ३८२३९ कोटी रुपयांवर गेली होती. असोसिएशनच्या आकडेवारीनुसार, ऑगस्टपर्यंत सलग ५४ व्या महिन्यात म्युच्युअल फंड गुंतवणूकीत वाढ झाली आहे.
आकडेवारीनुसार मात्र व्यवस्थापना अंतर्गत मालमत्तेत (Asset Under Management AUM) मध्ये मात्र किरकोळ घसरण झाली. जूनमध्ये मालमत्ता अंतर्गत व्यवस्थापन ७५.१८ लाख कोटी झा ले असून जुलै महिन्यात ७५.३५ लाख कोटी झाले आहे. सेक्टोरल व थीमॅटिक म्युच्युअल फंडात समाधानकारक वाढ झाली. आकडेवारीनुसार, सर्वाधिक वाढ फ्लेक्सी कॅप म्युच्युअल फंडात झाली आहे ज्यात आवक ७ ६७९ कोटींवर पोहोचली आहे. ही सलग ११ व्या महिन्यातील वाढ आहे. सेक्टोरल व थीमॅटिक म्युच्युअल फंडात ३८९३ कोटी रुपयांवर वाढ झाली.
लार्जकॅप, मिडकॅप, स्मॉलकॅप महिन्यात जुलै महिन्यात अनुक्रमे २१२५.०९, ५१८२.४९, ६४८४.४३ कोटींनी वाढ झाली आहे. गोल्ड ईटीएफ (Gold Exchange Traded Fund ETF) गुंतवणूकीत जुलै महिन्यात १२०० कोटींनी वाढ झाली होती ती मागील महिन्यात तब्बल ७२०० कोटींनी वाढ झाली आहे.