३५००० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी DHFL वाधवान बंधूवर ईडीकडून कारवाई वेगाने सुरू

मुंबई: युनियन बँक ऑफ इंडियासह १७ बँकांच्या एकूण ३४६१५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कपिल वाधवान भाऊ धीरज वाधवान आणि त्यांच्या व्यवसायिक कंपनी डीएचएफएल (DHFL) यांच्याविरुद्धच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मुंबईतील २० फ्लॅट्सवरील १५४ फ्लॅट्स आणि मिळकती जप्त केल्या आहेत. जप्त केलेले फ्लॅट्स कुर्ला येथील वाधवान समुहाने विकसित केलेल्या इमारतींमध्ये आहेत.यापूर्वी, तपास यंत्रणेने ७०.४ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केलेल्या मालमत्तेपेकी पेंटिंग्ज, शिल्पे, वांद्रे येथील दोन फ्लॅट्स, लक्झरी घड्याळे, हिऱ्यांचे दागिने आणि एका हेलिकॉप्टरमधील २०% हिस्सा यांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अलीकडच्या जप्तीसह, एकूण जप्त केलेल्या मालमत्तेचघे मूल्यांकन २५६ कोटी रुपये झाली आहे.


ईडीने म्हटले आहे की त्यांच्या तपासात असे दिसून आले आहे की डीएचएफएलचे माजी प्रवर्तक कपिल वाधवान, धीरज वाधवान आणि इतरांनी कंपनीच्या पुस्तकांमध्ये ( Book of Accounts) खोटेपणा करून आणि बँक कर्जांची थकबाकी करून बँक कर्ज निधीची उधळपट्टी करण्यात आणि गैरवापर करण्यात भूमिका बजावली होती. कपिल आणि धीरज यांनी डीएचएफएलच्या शेअर्स मध्ये फसव्या व्यापारासाठी प्रॉक्सी कंपन्या आणि इंटर-कॉर्पोरेट ठेवींद्वारे डीएचएफएल निधी वळवण्याचा कट रचला होता, असे मंगळवारी नियामकांकडून एका प्रेस रिलीजमध्ये म्हटले गेले आहे. त्यामुळे ईडीने वाधवान बंधूंवर गंभीर ठपका ठेवल्याने त्यांचावर आता कारवाईचा बडगा उगारला आहे.


प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, सप्टेंबर २०१८ मध्ये आरबीआयने येस बँकेचे तत्कालीन सीईओ राणा कपूर यांना आणखी दोन वर्षांसाठी मुदतवाढ देण्यास नकार दिल्यानंतर, स्टॉक एक्स्चेंज मध्ये डीएचएफए लच्या शेअर्सच्या किमतीत मोठी घसरण झाली होती. कपिल वाधवान यांनी त्यांच्या फर्ममधील ११५ कोटी रुपये कर्जाच्या नावाखाली एका बिल्डरमार्फत एका ब्रोकरला वळवले आणि भविष्यातील नफ्यासाठी डीएचएफएलचे शेअर्स कमी किमतीत खरेदी करण्याचे निर्देश दिले होते असाही आरोप त्यांच्यावर करण्यात आला.


ईडी आणि केंद्रीय अन्वेषण विभागाने नोंदवलेल्या अनेक प्रकरणांमध्ये वाधवान बंधू मनी लाँड्रिंग आणि बँक फसवणुकीच्या चौकशीला आता सामोरे गेले आहेत. त्यांनी विविध बँकांकडून डीएचए फएलच्या नावाने ४२८७१ कोटी रुपयांची क्रेडिट सुविधा घेतली आणि ती कर्जाच्या स्वरूपात त्यांच्याशी संबंधित अथवा शेल कंपन्यांना वळवल्याचा आरोप आहे. त्यानंतर, डीएचएफएलने ३४६१५ कोटी रुपयांच्या थकित कर्जाची रक्कम चुकती केली.


एकूण फसवणुकीच्या रकमेपैकी, वाधवान भावंडांनी त्यांच्याशी संबंधित ६६ संस्था किंवा त्यांच्या सहकाऱ्यांचा वापर करून कर्जाच्या नावाखाली डीएचएफएलकडून २४५९५ कोटी रुपये वळवले, ज्यापैकी ११९०९ कोटी रुपये अजूनही थकबाकी आहेत, असे सूत्रांनी प्रसारमाध्यमांना सांगितले आहे. याव्यतिरिक्त, डीएचएफएलने गृहकर्ज म्हणून अस्तित्वात नसलेल्या १.८ लाख व्यक्तींच्या नावे १४००० कोटी रुपयांचे खोटे कर्ज वितरित केल्याचा आरोप आहे आणि त्या नोंदी ठेवल्या, त्यांना 'वांद्रे बुक्स' म्हणून संबोधले, जे नंतर एनपीएत (Non Performing Assets NPA) रूपांतरित झाले आहे.

Comments
Add Comment

WPI Inflation: घाऊक ग्राहक किंमत महागाईत डिसेंबरमध्ये किरकोळ वाढ 'या' कारणामुळे

मोहित सोमण: प्राथमिक उत्पादन खर्चात वाढ झाल्याने यंदा घाऊक ग्राहक किंमती निर्देशांकात इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) ०.८६%

मध्यम कालावधीसाठी ६ कंपन्यांच्या शेअरला मोतीलाल ओसवालकडून गुंतवणूकदारांना खरेदीचा सल्ला

प्रतिनिधी: आज लघुकालीन व मध्यमकालीन परताव्यासाठी मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेसने ६ शेअर गुंतवणूकदारांना

BMC Election Result 2026 : मुंबईत 'महायुती'चा झंझावात! भाजप-शिंदे गटाने गाठलं 'शतक'; महापालिकेत सत्तांतराचे स्पष्ट संकेत

मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आज मोठा उलटफेर पाहायला

फेडरल बँकेच्या निव्वळ नफ्यातील ४.७% वाढीनंतर शेअरमध्ये 'इतकी' तुफान वाढ

मोहित सोमण: फेडरल बँकेचा तिमाही निकाल जाहीर झाला आहे. एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, बँकेच्या

Mumbai BMC Election Results 2026 LIVE Counting : मतमोजणीच्या अडीच तासांनंतर 'हे' उमेदवार ठरले विजयी; पाहा विजयी उमेदवारांची पहिली यादी

वॉर्ड २ – तेजस्वी घोसाळकर (भाजप) वॉर्ड १९ – प्रकाश तवडे (भाजप) वॉर्ड २० – दीपक तवडे (भाजप) वॉर्ड 36 – सिद्धार्थ

Tejasavee Ghosalkar : दहिसरमध्ये तेजस्वी घोसाळकरांचा 'महाविजय'! उबठाच्या धनश्री कोलगेंचा दारुण पराभव; मुंबईत भाजपची मुसंडी

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीत भाजपने दहिसरच्या बालेकिल्ल्यात भगवा फडकवला आहे. प्रभाग