शिवाजीनगरचं नाव सेंट मेरी स्टेशन करण्याचा काँग्रेसचा प्रस्ताव, मुख्यमंत्र्यांची काँग्रेसवर टीका


मुंबई : शिवाजीनगरचं नाव सेंट मेरी स्टेशन करण्याचा प्रस्ताव काँग्रेसने सादर केला आहे. काँग्रेसच्या या प्रस्तावावर भाजपने सडकून टीका केली आहे.


बंगळुरू शहरातल्या शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नामांतर करण्याचा प्रस्ताव कर्नाटक काँग्रेसने सादर केला आहे. शिवाजीनगरचं नाव सेंट मेरी स्टेशन करावं असा प्रस्ताव कर्नाटक काँग्रेसने सादर केला आहे. कर्नाटक काँग्रेसच्या या प्रस्तावावर भाजपने टीका केली आहे.


'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचं नाव बदलून सेंट मेरी करणं याचा मी निषेध करतो. एकप्रकारे छत्रपती शिवरायांचा अपमान करण्याचं काम हे कर्नाटकचं काँग्रेस सरकार करत आहे. याचं मला दु:ख आहे', असे महाराष्ट्राचे मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. 'छत्रपती शिवाजी महाराजांना अपमानित करण्याची परंपरा ही काँग्रेसमध्ये जवाहरलाल नेहरु पंतप्रधान असल्यापासून आहे. त्यापूर्वीही स्वातंत्र्यपूर्व काळात डिस्कवरी ऑफ इंडिया हे जे पुस्तक पंडित जवाहरलाल नेहरु यांनी लिहिलं होतं. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ज्याप्रकारचं मत व्यक्त केलं होतं हे आपल्याला माहिती आहे. तीच महाराजांना अपमान करण्याची परंपरा ही सातत्याने काँग्रेसच्या सरकारमध्ये दिसत आहे. आम्ही याचा निषेध करतो. मी ईश्वराताला प्रार्थना करतो की त्याने काँग्रेसला सद्बुद्धी द्यावी', असेही मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. 'ज्यांच्यामुळे या देशाने स्वराज्य पाहिलं, असे छत्रपती शिवराय यांचं नाव बदलून त्या ठिकाणी अशाप्रकारे कुठेतरी धार्मिक अशाप्रकारची विरोधी व्यवस्था उभी करायची आणि तेढ निर्माण करायचं, हे ते करणार नाही, बुद्धी त्यांना मिळावी, ही अपेक्षा', असे शेवटी मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.


Comments
Add Comment

महापालिकेच्या विद्यार्थ्यांसाठी १९,३१७ नवीन टॅबची खरेदी

मुंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिकेच्या शालेय विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेले टॅब आता जुने झाल्याने नव्याने

पाऊस पडल्यामुळे मुंबईची हवा झाली एकदम 'स्वच्छ'!

मुंबई : मुंबईत रात्री झालेल्या पावसामुळे मुंबईकरांना काही दिवसांपासूनच्या उष्णतेपासून आणि प्रदूषणापासून थोडा

शेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमारांना सवलतीच्या दरात वीज

मंत्री नितेश राणेंच्या प्रयत्नांना यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज सवलतीची केली घोषणा मुंबई : राज्य

कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांचे आयोजन

सोलापूर: येत्या काही दिवसांत पंढरपूर येथे कार्तिकी वारीचा सोहळा रंगणार आहे. यासाठी विविध राज्यातून वारकऱ्यांचा

मनसे दीपोत्सवात ड्रोन उडवणाऱ्यांवर गुन्हा दाखल

मुंबई : शिवाजी पार्क पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दीपोत्सव कार्यक्रमात ड्रोन उडवणाऱ्या अनेक

खोल समुद्रातील मासेमारीसाठी १४ सहकारी संस्थांना अद्ययावत समुद्री नौका

गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते सोमवारी वितरण मुंबई : महाराष्ट्रातील मच्छिमार सहकारी संस्थांसाठी २००