Thursday, September 11, 2025

युएस बाजारातील वाढीनंतर आजही शेअर बाजारात 'Feel Good' वातावरण सलग तिसऱ्यांदा वाढ 'हे' आहे सकाळचे विश्लेषण

युएस बाजारातील वाढीनंतर आजही शेअर बाजारात 'Feel Good' वातावरण सलग तिसऱ्यांदा वाढ 'हे' आहे सकाळचे विश्लेषण

मोहित सोमण:आज सकाळच्या सत्रात गिफ्ट निफ्टीत वाढीमुळे सलग चौथ्यांदा आज बाजारात वाढ होण्याची शक्यता आहे. विशेषतः भूराजकीय अनुकूल स्थितीमुळे ही वाढ होणे अपेक्षित आहे तरीही अस्थिरता कायम आहे. सकाळच्या सत्रातील सुरुवातीला सेन्सेक्स १२६.३७ अंकाने व निफ्टी २८.७० अंकाने उसळला आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांकात २३.२६ अंकाने व बँक निफ्टीत २५. ६५ अंकांने वाढ झाली आहे. बीएसई मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.२७%,०.१७% वाढ झाली आहे तर एनएसई मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.२७%,०.२८% वाढ झाली आहे. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात सुरूवातीच्या कलात सर्वाधिक वाढ पीएसयु बँक (०.८९%), फार्मा (०.४८%), तेल व गॅस (०.८९%) निर्देशांकात झाली आहे तर घसरण ऑटो (०.०३%), खाजगी बँक (०.०१%), आयटी (०.४१%) निर्देशांकात झाली आहे.

काल युएसमध्ये उत्पादन किंमत निर्देशांक आकडेवारी जाहीर केली. ऑगस्ट महिन्यात पीपीआय (Producer Price Index PPI) आकडेवारीत ऑगस्ट महिन्यात ०.०१% अनपेक्षितपणे घसरण झाली. त्यामुळे युएसमध्ये सलग तिसऱ्यांदा उत्पादन आऊटपुट किंमतीत घसरण झाल्याने स्वस्ताई दिसून आली ज्याचा जागतिक फायदा आज आंतरराष्ट्रीय स्तरावर होऊ शकतो. खरं तर अर्थत ज्ज्ञ आऊटपूट किंमतीत वाढ अपेक्षित करत होते मात्र कोर पीपीआयमध्ये घसरण झाली ज्यामध्ये मूलभूत अन्न व उर्जा उत्पादनातील किंमतीत ०.१% घसरण झाली.

याशिवाम पुढील आठवड्यात फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपातीकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. युएस प्रसारमाध्यमांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, ०.५०, बेसिस पूर्णांकाने कपात अपे क्षित आहे. असे असले तरीही युएस बाजारातील गुंतवणूकदारांनी किरकोळ अथवा संमिश्र प्रतिसाद दिला. टॅरिफ वाढीमुळे महसूल वाढला तरी मूलभूत संसाधनावरील ताण घटलेली मूलभूत वस्तू ची आयात, घटलेली रोजगारी, वाढलेली महागाई ही कारणे बहुदा दीर्घकालीन गुंतवणूकीसाठी गुंतवणूकदारांना त्रस्त करत आहे. यामुळे युएस बाजारात काल डाऊ जोन्स (०.१२%), एस अँड पी ५०० (०.३०%), नासडाक (०.३०%) निर्देशांकात वाढ झाली. मात्र नव्या आकडेवारीनंतर आशियाई बाजारातही त्यांचे सकारात्मक परिणाम बुधवारी झाले. केवळ हेंगसेंग (०.६२%) बाजारात घसर ण झाली असली तरी इतर सगळ्या आशियाई निर्देशांकात वाढ झाली आहे.

सोने रोज नवनवीन उच्चांक प्रस्थापित करत आहे काल युएस डॉलरसह कमोडिटीत वाढलेल्या दबावामुळे सोने ११०००० रूपया पलीकडे भारती शय सराफा बाजारात पोहोचले. परिणामी आजही वाढ झाली आहे. रूपयात सातत्याने घसरण होत असली तरी काल मात्र कमकुवत झालेल्या डॉलरनंतर रूपया किरकोळ अंकाने वधारला. आज दरकपातीचे संकेत युएस बाजारात मिळत अस ल्याने परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (Foreign Institutional Investors FII) कडून गुंतवणूक काढून घेण्याचे सत्र कायम राऊ शकते. तत्पूर्वी भारतीय गुंतवणूकदारांनी बाजारातील रोख गुंतवणूक वाढवल्यास बाजाराला मूलभूत आधार मिळू शकतो. जीएसटी दर कपातीमुळे ग्राहक निर्देशित क्षेत्रीय निर्देशांक चांगली कामगिरी करत आहेत मात्र जागतिक पातळीवरील भूराज कीय स्थितीचा परिणाम आज निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात होण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे दिलासा देणारी बाब म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपियन युनियनला रशियाच्या तेलाचे मुख्य खरेदीदार असलेल्या भारत किंवा चीनवर जोरदार कर लावण्याचे आ वाहन केल्यानंतर युरोपियन युनियन त्यांच्यावर कठोर शुल्क लादण्याची शक्यता मात्र कमी आहे, असे आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे.युक्रेनवरील पूर्ण प्रमाणात आ क्रमण केल्याबद्दल रशियाविरुद्धच्या निर्बंधांवर दोन्ही बाजूंनी कसे समन्वय साधता येईल यावर चर्चा करण्यासाठी ईयूच्या (European Union EU) रशिया निर्बंध प्रमुखांसह ईयूचे एक शिष्टमंड ळ या आठवड्यात वॉशिंग्टनला गेले होते. त्यामुळे भारताला दिलासा मिळाला आहे. कच्च्या तेलाच्या (Crude Oil) मध्ये बऱ्यापैकी स्थिरता प्राप्त झाल्याने काल WTI, Brent Future निर्देशांकात घसरण झाली होती जी आजही कायम आहे.एफआयआय, डीआयआय डेटा एनएसईवर उपलब्ध असलेल्या तात्पुरत्या आकडेवारीनुसार (Provisional), १० सप्टेंबर २०२५ रोजी परदेशी संस्था त्मक गुंतवणूकदार (FII) ११५.६९ कोटी रुपयांच्या शेअर्सचे निव्वळ विक्रेते होते. दुसरीकडे, देशांतर्गत घरगुती संस्थात्मक गुंतवणूकदार (DII) ५००४.२९ कोटी रुपयांच्या शेअर्सचे निव्वळ खरेदीदार होते.

सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ ओरॅकल फिनसर्व्ह (१०.००%), ज्युपिटर वॅगन्स (४.३१%), टोरंट फार्मास्युटिकल (३.०२%), जेल इंडिया (२.८८%), एसईएमई सोलार होल्डिंग्स (२.००%), आर आर केबल्स (१.९५%),गॉडफ्रे फिलिप्स (१.६०%), मुथुट फायनान्स (१.४५%), डीएलएफ (१.४२%), रेल विकास (१.३६%), होम फर्स्ट फायनान्स (१.३१%), अदानी पोर्ट (१.३१%) समभागात झा ली आहे.सकाळच्या सत्रात सर्वाधिक घसरण गुजरात फ्ल्यूरोटेक (३.२५%), मदर्सन वायरिंग (१.८६%), परसिसटंट (१.८३%), वर्धमान टेक्सटाईल (१.७९%), सीसीएल प्रोडक्ट (१.७३%), नेटवेब टेक्नॉलॉजी (१.६५%), एचबीएल इंजिनिअरिंग (१.४६%), डॉ रेड्डीज (१.४४%), वेलस्पून लिविंग (१.१९%) निर्देशांकात झाली आहे.

आजच्या सकाळच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार डॉ वी के विजयाकुमार म्हणाले आहेत की,'गेल्या काही काळापासून शेअर बाजारातील एक महत्त्वाचा ट्रेंड म्हणजे इतर बाजारपेठांच्या तुलनेत भारताची कामगिरी कमी आहे. अमेरिका, तैवान आणि कोरिया सारख्या अनेक बाजारपेठा नवीन वि क्रमी उच्चांक प्रस्थापित करत असताना, निफ्टी अजूनही सप्टेंबर २०२४ मध्ये स्थापित केलेल्या विक्रमापेक्षा ४.४% खाली आहे. मुख्यत्वे ही कामगिरी कमी आहे कारण बाजारात सतत देशांतर्गत भां डवलाच्या प्रवाहामुळे झालेल्या अतिमूल्यांकनातील सुधारणा. आता लार्जकॅप्सचे मूल्य चांगले आहे, परंतु मिड आणि स्मॉलकॅप्स, विशेषतः नंतरचे, अतिमूल्यांकन करत आहेत.

भारताचे लवचिक मॅक्रो आणि या वर्षी अंमलात आणलेल्या व्यापक सुधारणा, विशेषतः जीएसटी सुधारणा, अर्थव्यवस्थेला ब्रेकआउट वाढीच्या शिखरावर घेऊन गेल्या आहेत. ट्रम्प टॅरिफमध्ये घट ही एकमेव समस्या आहे, जी अध्यक्ष ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्या अलिकडच्या टिप्पण्यांवरून समाधानाकडे वाटचाल करत असल्याचे दिसून येते.बाजार लवकरच आर्थिक वर्ष २७ मध्ये अ पेक्षित असलेल्या उच्च उत्पन्न वाढीला कमी लेखण्यास सुरुवात करेल. मूलभूतपणे, सुरक्षितता लार्जकॅप्समध्ये आहे.'

आजच्या बाजारातील सकाळच्या सत्रावर विश्लेषण करताना एचडीएफसी सिक्युरिटीजचे हेड ऑफ प्राईम रिसर्च देवार्ष वकील म्हणाले आहेत की,'ओरेकलच्या तेजीमुळे अमेरिकन बाजार विक्र मी उच्चांकावर पोहोचले, भारतीय बाजारांना ब्रेकआउटची अपेक्षा आहे.एस अँड पी ५०० आणि नॅस्डॅक उच्चांकावरून मागे हटले परंतु तरीही विक्रमी पातळीवर बंद झाले, एस अँड पी ५०० ने वर्षभराच्या तुलनेत ११% वाढ केली आणि नॅस्डॅक १३% वाढला.सॉफ्टवेअर दिग्गज ओरेकलने क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर महसूल २०३० पर्यंत १४४ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचेल असा अंदाज वर्तवल्यानंतर १९९२ नंतरच्या सर्वात मोठ्या एका दिवसाच्या वाढीमध्ये ३६% वाढ केली, जो २०२५ च्या आर्थिक वर्षात १०.३ अब्ज डॉलर्स होता.

मंगळवार नवीन आयफोन, अ‍ॅपल घड्याळे आणि एअरपॉड्स लाँच झाल्यानंतर अ‍ॅपलने घसरण केली. सेल्सफोर्स आणि अ‍ॅमेझॉनकडून झालेल्या तोट्यामुळे डाऊवरही दबाव आला.फेडरल रिझ र्व्हच्या दर कपातीच्या अपेक्षांना बळकटी देणाऱ्या अपेक्षेपेक्षा कमी महागाईच्या आकडेवारीमुळे बाजारातील ताकदीला पाठिंबा मिळाला. जुलैमध्ये सुधारित ०.७% वाढीनंतर ऑगस्टमध्ये उत्पाद कांच्या किंमती अनपेक्षितपणे ०.१% घसरल्याचे कामगार विभागाने नोंदवले. अर्थशास्त्रज्ञांनी सुरुवातीला नोंदवलेल्या ०.९% वाढीच्या तुलनेत ०.३% वाढ होण्याचा अंदाज वर्तवला होता.ऑगस्टमध्ये वार्षिक उत्पादक किंमत वाढ जुलैमध्ये सुधारित ३.१% वरून २.६% पर्यंत कमी झाली, जी सुरुवातीला नोंदवलेल्या ३.३% वर स्थिर राहण्याची अपेक्षा कमी होती.वॉल स्ट्रीटच्या तेजीमुळे स्टॉक आ णि बाँड दोन्ही उंचावले, उत्पादक किमतीत घट झाल्याने गुरुवारी आशियाई समभागांमध्ये मिश्र व्यवहार झाले, कारण फेडरल रिझर्व्ह पुढील आठवड्यात व्याजदर कपात पुन्हा सुरू करेल अशी अपेक्षा बळावली.

मध्यवर्ती बँकेच्या सवलतीच्या अपेक्षा आणि पूर्व युरोप आणि मध्य पूर्वेतील वाढत्या भू-राजकीय तणावामुळे सोने प्रति औंस ३६४२ डॉलरवर पोहोचले, जे त्याच्या सर्वकालीन उच्चांकी पातळीवर पो होचले.डोनाल्ड ट्रम्प यांच्या रशियावरील अलीकडील टिप्पण्या आणि त्यांच्या संभाव्य बाजारातील परिणामांचे गुंतवणूकदारांनी विश्लेषण केल्याने सलग तीन दिवसांच्या वाढीनंतर तेलाच्या किमती स्थिर झाल्या.इंडोनेशियातील पुरवठा व्यत्ययाच्या चिंतेमुळे आणि चीनच्या औद्योगिक क्षेत्रातील चलनवाढीचा दबाव कमी होऊ लागल्याची चिन्हे दिसू लागल्याने लंडन मेटल एक्सचेंजमध्ये तांबे प्रति टन १०००० डॉलरच्या वर वाढला.अमेरिकेसोबतच्या द्विपक्षीय व्यापार चर्चेत उत्साहवर्धक प्रगतीमुळे काल निफ्टीने सलग सहाव्या सत्रात आपली तेजी वाढवली.निर्देशांक सर्व प्रमुख मूव्हिंग सरास रीपेक्षा वरचढ राहिला आहे, जो पुढील वरच्या गतीला समर्थन देणारी तेजीची रचना दर्शवितो. तात्काळ प्रतिकार २५१५३ पातळीवर आहे, जो मागील स्विंग हायने चिन्हांकित केला आहे, तर २४८० ० पातळीवर कोणत्याही पुलबॅकवर जवळचा आधार पातळी प्रदान करतो.सकारात्मक जागतिक संकेतांमुळे भारतीय बाजार आज माफक प्रमाणात वर उघडण्यास सज्ज आहेत. २५०५० पातळी च्या वर सततची हालचाल शॉर्ट कव्हरिंगद्वारे अतिरिक्त नफा मिळवू शकते.'

सकाळच्या सत्रातील निफ्टी पोझिशनवर भाष्य करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य बाजार रणनीतीकार आनंद जेम्स म्हणाले आहेत की,'२५०१२ पातळीच्या वरच्या ट्रे डमध्ये चढउतारांचा पाठलाग करण्यासाठी आपण सातत्यपूर्ण ट्रेड शोधू, ज्यामध्ये डाउनसाइड मार्कर २४९३० पातळीच्या जवळ आहे. दरम्यान, वरच्या दिशेने उद्दिष्ट २५४०० पातळीवरच राहते, परंतु यासाठी थोडा वेळ लागू शकतो, २५१०० हा सर्वात जवळचा आव्हान म्हणून पाहिला जात आहे. काल सांगितल्याप्रमाणे, २५१०० क्षेत्राच्या पलीकडे जाण्यास असमर्थता किंवा २४७०० पातळी च्या खाली थेट घसरण यामुळे चढउतारांची परिपक्वता विलंबित होऊ शकते.'

यामुळे आज बाजारात 'फिल गुड' वातावरण असले तरी आज अस्थिरता कायम आहे. मात्र भारताच्या मजबूत फंडामेंटलसह घरगुती गुंतवणूकदारांनी वाढविलेल्या गुंतवणूकीच्या आधारे बाजाराची सपोर्ट लेवल अखेरच्या सत्रात निश्चित होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment