
मुंबई : हिंदू दिनदर्शिकेनुसार , शारदीय नवरात्रीचा पहिला दिवस २२ सप्टेंबर २०२५ रोजी आहे. या काळात देवी दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. नऊ दिवसांचे नवरात्री व्रत केल्यानंतर, नवमीला कन्या पूजन केले जाते आणि दशमीला अर्थात दसऱ्याला रावण दहन केले जाते . दरवर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला शारदीय नवरात्रोत्सव सुरू होतो, जो वाढत्या चंद्राचे प्रतीक मानला जातो. हा काळ अत्यंत सकारात्मक मानला जातो. यंदा नऊ ऐवजी दहा दिवसांचा नवरात्रौत्सव आहे आणि दसरा अकराव्या दिवशी आहे.
नवरात्रीत एक दिवस वाढण्याचे कारण :
यावर्षी शारदीय नवरात्र २२ सप्टेंबरपासून सुरू होईल. यावेळी नवरात्रात एक तिथी वाढत आहे. २०२५ मध्ये शारदीय नवरात्र ९ ऐवजी १० दिवसांची असेल. नवरात्र २२ सप्टेंबरपासून सुरू होईल. २४ आणि २५ सप्टेंबर रोजी तृतीया तिथी व्रत पाळले जाईल. यावेळी तृतीया तिथी दोन दिवसांची असेल, त्यामुळे शारदीय नवरात्र एक दिवसाने वाढेल. ज्योतिषशास्त्रानुसार यावेळी शारदीय नवरात्रात एक तिथी वाढत आहे. नवरात्रात तिथी वाढणे खूप शुभ मानले जाते. या कारणास्तव, नवरात्रीचा संपूर्ण काळ शुभ राहील. कलश स्थापना २२ सप्टेंबर रोजी केली जाईल. नवरात्र २२ सप्टेंबरपासून सुरू होईल आणि १ ऑक्टोबरपर्यंत चालेल. महानवमी १ ऑक्टोबर रोजी आहे आणि हा उत्सव २ ऑक्टोबर रोजी विजयादशमी अर्थात दसऱ्याला संपेल.