
मोहित सोमण: आज अर्बन कंपनी लिमिटेड आयपीओसाठी बाजारात सचीबद्ध (Listed) झाला आहे. पहिल्याद दिवशी आयपीओने कमाल केली आहे. थेट ३.२९ पटीने कंपनीच्या आयपीओला सबस्क्रिप्शन मिळाले आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वाधिक मागणी किरकोळ गुंतवणूकदारांकडून (Retail Investors) आली आहे तर त्यानंतर विना संस्थात्मक गुंतवणूकदारां कडून (NII) व पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (QIB) यांच्याकडून मिळविले आहे. बाजारातील उपलब्ध माहितीनुसार, कंपनीच्या आयपीओला सामान्य गुंतवणूकदारांकडून ७.३ पटीने सब स्क्रिप्शन मिळाले आहे. तर पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून १.३७ पटीने व विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून ४.३७ पटीने सबस्क्राईब करण्यात आले आहे. कंपनीच्या आयपीओतील पूर्वसं ध्येलाच मुळ किंमतीपेक्षाही ३८ रूपये प्रिमियम दराने सुरु होते.
१९०० कोटींचा हा मोठा आयपीओ एनएसई व बीएसई बाजारात आजपासून दाखल झाला. १७ सप्टेंबरला कंपनी सूचीबद्ध (Listed) होणार आहे. एकूण आयपीओतील गुंतवणूकीपैकी पात्र संस्था त्मक गुंतवणूकदारांसाठी ७४.९०%, विना संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी १४.९८% , किरकोळ गुंतवणूकदारांसाठी ९.९९% , कर्मचाऱ्यांसाठी ०.१३% वाटा गुंतवणूकीसाठी उपलब्ध होता. प्रसिद्ध घर व ब्युटी सर्विसेस सेवा देणारी ईकॉम कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या आयपीओतील मिळणाऱ्या निधीचा कंपनी नव्या भांडवल गरजेसाठी, थकबाकी, मार्केटमध्ये वाढलेल्या खर्चासाठी, व इतर दैनंदिन कामकाजासाठी करण्यात येणार आहे.