नवी दिल्ली: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मंगळवारी म्हणाले की त्यांना पूर्ण विश्वास आहे की वॉशिंग्टन आणि दिल्ली यांच्यात सुरू असलेल्या व्यापारा चर्चेचे यशस्वी परिणाम दिसतील. ते म्हणाले की येणाऱ्या काही आठवड्यांमध्ये ते आपले सर्वात चांगले मित्र पंतप्रधान मोदींशी बातचीत करण्यास उत्सुक आहेत.
आपले मित्र मोदींशी बातचीत करण्यास उत्सुक
ट्रम्प यांनीसोशल मिडिया प्लॅटफॉर्म ट्रुथवरील पोस्टमध्ये लिहिले की, भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार अडथळे दूर करण्यासाठी बातचीत सुरू असल्याचा मला आनंद आहे. मी माझे चांगले मित्र पंतप्रधान मोदींशी आगामी आठवड्यांमध्ये संवाद साधण्यासाठी उत्सुक आहे. मला पूर्ण विश्वास आहे की दोन्ही महान देशांसाठी या संवादातून नक्कीच चांगले फळ मिळेल.
भारत-अमेरिका संबंध खास
याआधी शनिवारी ट्रम्प यांनी भारत-अमेरिका यांच्यातील संबंध खास असल्याचे म्हटले होते. मी नेहमीच पंतप्रधान मोदींचा मित्र राहीन. ते एक महान पंतप्रधान आहेत. मी नेहमीच त्यांचा मित्र राहीन मात्र सध्या ते जे काही करत आहेत ते मला आवडत नाहीये. मात्र भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध खास आहे. चिंतेचे कारण नाही. कधी कधी आमच्यात थोडे थोडे मतभेद होतात.
ट्रम्प यांच्या या विधानावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सकारात्मक प्रतिक्रिया दिली. त्यांनी 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हटले की, "मी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या भावनांचा आणि आमच्या संबंधांच्या सकारात्मक मूल्यांकनाचा मनापासून आदर करतो." भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनीही दोन्ही देशांमधील संबंधांवर सकारात्मकता व्यक्त केली आहे.