Wednesday, September 10, 2025

शेअर बाजार सुसाट ! सेन्सेक्स निफ्टी वाढीत आयटी मिड स्मॉल कॅप शेअरचा मोठा वाटा 

शेअर बाजार सुसाट ! सेन्सेक्स निफ्टी वाढीत आयटी मिड स्मॉल कॅप शेअरचा मोठा वाटा 
मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात अखेरच्या सत्रात चांगली वाढ झाली आहे. सलग शेअर बाजारात तिसऱ्यांदा व निफ्टी ५० मध्ये सलग पाचव्यांदा वाढ झाली आहे. विशेषतः आय टी क्षेत्रातील शेअर्समध्ये होत असलेल्या रॅलीचा फायदा घरगुती गुंतवणूकदारांना झाला आहे. सेन्सेक्स ३२३.८२ अंकांने वाढला असून ८१४२५.१५ पातळीवर स्थिरावला आहे. निफ्टी ५० हा १०४.५० अंकांने वाढत २४९७३.१० पातळीवर स्थिरावला आहे. अखेरच्या सत्रात सेन्सेक्स बँक निर्देशांकात ४११.०७ व बँक निफ्टीत ३१९.९० अंकांने मोठी वाढ झाल्याने बाजारात मोठी रॅली शक्य झाली आ हे. आज अखेरच्या सत्रापर्यंत सेन्सेक्स मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.८४%,०.७२% वाढ झाली आहे व निफ्टी मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये ०.८४%,०.७२% वाढ झाली आहे. निफ्टी क्षेत्रीय नि र्देशांकात ऑटो (१.२८%), मिडिया (०.६३%), कंज्यूमर ड्युरेबल्स (०.३०%) निर्देशांकात घसरण झाली असून सर्वाधिक वाढ मिडस्मॉल आयटी टेलिकॉम (३.२८%), पीएसयु बँक (२.०९%), आय टी (२.६३%) निर्देशांकात वाढ झाली.आज जागतिक पातळीवर अस्थिरतेच्या तोंडावर आयटी शेअर्समध्ये गेल्या तीन सत्रात मोठ्या प्रमाणात वाढ सुरु आहे. मिड स्मॉल कॅप शेअरसह आज ब्लू चिप्स कंपनीच्या स्क्रिपमध्येही वाढ झा ल्याने बाजारात सपोर्ट लेवल मिळाली.
आज अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ ओरॅकल फिनसर्व्ह (१०.१२%), वेलस्पून लिविंग (९.८७%), वर्धमान टेक्सटाईल (८.१२%), अपार इंडस्ट्रीज (६.८४%), इंटलेक्ट डिझाईन (५.८२%), भारत डायनामिक्स (५.११%), पुनावाला फायनान्स (४.५४%), झेन टेक्नॉलॉजी (४.५०%), हिताची एनर्जी (४.४०%), एसबीआय कार्ड (४.२८%), कोफोर्ज (४.२४%), बँक ऑफ इंडिया (४.१९%), एचसीएल टेक्नॉलॉजी (२.५८%), टीसीएस (१.९९%), होम फर्स्ट फायनान्स (१.९१%), इन्फोसिस (१.८८%) समभागात झाली आहे.
आज अखेरच्या सत्रात सर्वाधिक घसरण जे एम फायनांशियल सर्विसेस (७.९०%), ब्रेनबीज सोलूशन (४.५१%), विजया डायग्नोस्टिक (३.०५%), कोहान्स लाईफ (२.९४%), स्विगी (२.९२%), बीए सई (३.६८%), एमआरएफ (२.७२%), अव्हेन्यू सुपरमार्ट (२.७०%), टीबीओ टेक (२.०५%), मारुती सुझुकी (१.६७%) समभागात झाली आहे. त्यामुळे आज शेअर बाजारात वाढ झाली असली तरी दुसरीकडे युएस बाजारातील टॅरिफ घडामोडीकडे गुंतवणूकदारांचे लक्ष केंद्रित झाले आहे. अस्थिरता असलेल्या कमोडिटीसह गुंतवणूकदार आपली गुंतवणूक राखून ठेऊ शकतील. तत्पूर्वी गुंत वणूकदारांना निफ्टी श्रेत्रीय निर्देशांकात लक्ष केंद्रित करणे फायद्याचे ठरू शकते.

Comments
Add Comment