लालबाग राजाच्या 'त्या' व्हिडिओप्रकरणी फोटोग्राफरवर गुन्हा दाखल

मुंबई: लालबागचा राजा मंडळ आणि मुंबई पोलिसांबाबत गैरसमज निर्माण करणारे रिल तयार केल्याप्रकरणी एका फोटोग्राफरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लालबागचा राजाच्या विसर्जनादरम्यान पोलिस गर्दीतून राजाची वाट मोकळी करत असताना, फोटोग्राफरने आपल्या रिलमध्ये चुकीचा संदेश देत तो व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल केला होता.

लालबागचा राजाच्या विसर्जनाला विलंब झाल्यानंतर सोशल मिडियावर अनेकांनी रिल्सच्या माध्यमातून त्यावर प्रश्न उपस्थित केले होते.  यादरम्यान लालबाग राजाच्या बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांवर रिल बनवल्याप्रकरणी एका फोटोग्राफरवर काळाचौकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्हिडिओमध्ये काय आहे?


सदर फोटोग्राफरने तयार केलेल्या या व्हिडिओत लालबागच्या राजाचे दर्शन श्रीमंत लोकांसाठी तसेच सेलिब्रिटींसाठी सोईस्कर आणि सर्व सामान्यांसाठी खड:तर असे  दाखवण्यात आले आहे. या प्रकरणी समाज माध्यमात खोटी आणि बदनामीकारक माहिती प्रसारित केल्याने पोलिसांनी संबधितावर गुन्हा दाखल केला आहे.

लालबागचा राजाच्या विसर्जनाला उशीर झाल्यामुळे या संदर्भात अनेक चर्चा झाल्या होत्या. अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल झाला खरा, मात्र अपेक्षेप्रमाणे त्याचे विसर्जन दीड-दोन तासांमध्ये झाले नाही. समुद्राला आलेली भरती आणि तांत्रिक कारणामुळे त्याचे विसर्जन रखडले. जे रात्री ९ वाजता झाले.

लालबागचा राजाच्या विसर्जनाचे वाद 


यावर्षी लालबागचा राजाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भविकांवर केला जाणारा अन्याय आणि श्रीमंत लोकांना दिल्या जाणाऱ्या खास ट्रीटमेंटमुळे, लालबागचा राजा मंडळ आणि कार्यकर्त्यांची प्रचंड नाचक्की झाली. त्यानंतर परंपरेनुसार लालबागच्या राजाचे विसर्जन देखील वेळेत झाले नाही. यासंदर्भात एका कोळी बांधवाने प्रतिक्रिया दिली होती, जी मंडळाच्या विरोधात होती, त्यामुळे गिरगाव चौपाटीचे नाखवा हिरालाल वाडकर (Hiralal Wadkar) यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार  असल्याचा इशारा लालबागचा राजा मंडळाने दिला. हे प्रकरण ताजे असताना आता  लालबागचा राजा मंडळ आणि मुंबई पोलिसांबाबत (Mumbai Police) गैरसमज निर्माण करणारे रिल (Reel) तयार केल्याप्रकरणी फोटोग्राफरवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्यामुळे, गणेशोत्सव संपून ५ दिवस झाले असले तरी, लालबाग राजाशी संबंधीत वाद अद्याप संपले नसल्याचे दिसून येत आहे.
Comments
Add Comment

महापालिकेच्या मालमत्ता विभागांमध्ये वर्षांनुवर्षे अधिकारी एकाच जागेवर, विकासकांची साठेलोटे असल्याचा बीआयटी चाळीतील भाडेकरुंचा आरोप

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्या मालमत्ता विभागात मागील १६ वर्षांपासून अधिकारी कार्यरत असून यातील

दादर पश्चिमेची वाहतूक कोंडी सुटणार

जे. के. सावंत मार्ग जोडणारा येलवे रस्ता सेनापती बापट मार्गाला जोडणार मुंबई : एलफिन्स्टन पूल बंद करण्यात आल्याने

मुंबईत आधीपासूनच ८ ठिकाणी भटक्या श्वानांचे निर्बिजीकरण, लसीकरण

मुलुंडमध्ये विरोध झाल्याने महापालिका अधिकारी झाले अवाक् मुंबई : महानगरपालिकेच्या सहकार्याने मुंबईत एकूण ८

भरती परीक्षेच्या निकालानंतर चार दिवसांत नियुक्तीपत्र

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रशासनाला निर्देश मुंबई (प्रतिनिधी) : शासकीय सेवांमध्ये विविध पदांच्या

वरळी विधानसभेत प्रभाग आरक्षित झाल्याने मनसेची पंचाईत

भाजप, शिवसेनेच्या वाट्याला येणार प्रत्येकी तीन प्रभाग यंदा वरळीत भाजप कमळ फुलवणार? सचिन धानजी मुंबई : दक्षिण

राज्यात अनेक जिल्ह्यांना आज थंडीचा इशारा

मुंबई : राज्यात सर्वदूर तापमानाचा पारा कमालीचा घसरला आहे. गेले अनेक दिवस थंडीचा कडाका कायम असून मंगळवारी (दि. १८