Wednesday, September 10, 2025

सागरी मंडळाच्या प्रकल्पांना विविध परवानगी मिळवण्यासाठी एक खिडकी योजना सुरू करा

सागरी मंडळाच्या प्रकल्पांना विविध परवानगी मिळवण्यासाठी एक खिडकी योजना सुरू करा

मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या सर्वसंबंधितांना सूचना

मुंबई : महाराष्ट्र सागरी महामंडळाच्या विविध प्रकल्पासाठी पर्यावरण, वने यासह विविध विभागांच्या परवानग्या आवश्यक असतात. या सर्व परवानग्या मिळवण्यासाठी एक खिडकी योजना सुरू करावी अशा सूचना मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या. महाराष्ट्र सागरी मंडळाचे विविध विषयांचा आढावा मंत्री राणे यांनी आज मंत्रालयात घेतला. त्यावेळी मंत्री राणे बोलत होते.

उद्योग विभागाच्या मैत्रीच्या धर्तीवर यंत्र तयार करावी असे सांगून मंत्री राणे म्हणाले की, सागरी मंडळाच्या जागेवरील स्टॉल साथीचे भाडे तातडीने निश्चित करण्याची कार्यवाही करावी. होर्डिंग्ज उभारण्याच्या काम गती द्यावी. नोव्हेंबर पर्यंत सर्व नियोजित होर्डिंग्ज उभारण्यात यावीत. या सर्व प्रकल्पासाठी लागणारी परवान्यांसाठी पर्यावरण विभागाशी समन्वय ठेवावा अशा सूचनाही मंत्री राणे यांनी दिल्या.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >