Thursday, September 11, 2025

IND vs UAE: सूर्या ब्रिगेडची विजयी सलामी, भारताने यूएईला ९ विकेटनी हरवले

IND vs UAE: सूर्या ब्रिगेडची विजयी सलामी, भारताने यूएईला ९ विकेटनी हरवले

दुबई: आशिया कप २०२५मध्ये टीम इंडियाने विजयी सलामी दिली आहे. पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने यूएईवर दणदणीत विजय मिळवला आहे. यूएईवर भारताने ९ विकेट राखत विजय मिळवला आहे. या सामन्यात यूएईने पहिल्यांदा गोलंदाजी करताना अवघ्या ५७ धावाच केल्या. ५७ धावांतच त्यांचे १० गडी बाद झाले. कुलदीप यादवने चार बळी घेतले तर शिवम दुबेने तीन विकेट घेतल्या.

आजचा हा सामना दुबईच्या दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळवला जात आहे. सामन्यात टॉस जिंकत भारताने पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. यूएईच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना १३.१ षटकांत केवळ ५७ धावा केल्या. यूएईकडून अलिशान शराफूने सर्वाधिक २२ धावा केल्या. तर त्याच्यापाठोपाठ सलामीवीर मोहम्मद वसीमने १९ धावा केल्या.

त्यानंतर भारताचे सलामीवीर ही धावसंख्या पूर्ण करण्यास पुरेसे ठरले. सलामीवीर अभिषेक शर्माने ३० धावा ठोकल्या तर सलामीवीर शुभमन गिलने नाबाद २० धावांची खेळी केली. तिसऱ्या स्थानावर आलेल्या सूर्याने नाबाद ७ धावा केल्या. भारताचा पुढील सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. १४ सप्टेंबरला हा सामना रंंगत आहे.

Comments
Add Comment