फ्रान्समध्ये संसदेत अस्थिरता, रस्त्यावर अराजकता

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तब्बल ऐंशी हजार पोलिस तैनात


पॅरीस : नेपाळमध्ये झालेल्या प्रचंड उलथापालथीनंतर आता फ्रान्सही पेटले आहे. फ्रान्सच्या रस्त्यांवर सध्या जोरदार निदर्शने सुरू आहेत, तर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात आहे. मात्र परिस्थिती चिघळत असल्याचे दिसत आहे. एकूणच सद्यस्थितीस फ्रान्समध्ये रस्त्यावर अराजकता आणि संसदेत अस्थितरता निर्माण झालेली आहे.


फ्रान्सची राजधानी पॅरीससह अनेक मोठ्या शहरांमध्ये बुधवारी सकाळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये प्रचंड संघर्ष उफाळला. ब्लॉक एव्हरिथिंग या नावाने सुरू झालेल्या या आंदोलनामुळे देशाची संपूर्ण परिवहन व्यवस्था विस्कळीत करून टाकली आहे. केवळ पॅरीसमध्येच २०० पेक्षा अधिक जणांना अटक करण्यात आलेली आहे. चेहरा झाकलेल्या आंदोलकांनी जागोजागी मोठमोठे कचऱ्याचे ड्रम आणि बॅरिकेड्स लावून रस्ते जामा केले आहेत. बरदॉ आणि मार्सिलेसारख्या शहरांमध्ये तर जमावाने चौकांना घेरले आहे. पोलिसांवर बाटल्या फेकल्या जात आहेत. एवढेच नाहीतर पॅरीसमधील गारे दू नॉर रेल्वे स्टेशनलाही आंदोलकांनी निशाणा बनवले आहे.


पोलिसांची म्हणणे आहे की, अटक करण्यात आलेले बहुतांश लोक हे सार्वजनिक व्यवस्था भंग करण्याचा प्रयत्न करत होते. शिवाय अशीही भीती व्यक्त केली गेली आहे की, जसजसा दिवस मावळेल तसे हे आंदोलन अधिक चिघळू शकते. जमाव अधिक वाढवू शकतो. हे आंदोलन अशावेळी सुरू झाले आहे, जेव्हा राष्ट्रपती इमॅन्यूएल मॅक्रो यांनी अवघ्या २४ तासांपूर्वीच देशाचे नवीन पंतप्रधान सेबास्टियन लेकोर्नू यांची नियुक्ती केली आहे.


लेकोर्नू यांनी संसदेत अविश्वास प्रस्तावास सामोरे गेलेल्या माजी पंतप्रधान फ्रांस्वा बायरो यांची जागा घेतली आहे. बायरो यांना सोमवारी रात्री राजीनामा द्यावा लागला होता. बायरो यांनी देशाचे कर्ज कमी करण्यासाठी जवळपास ३.७ लाख कोटी रुपयांची कपात योजना सादर केली होती, परंतु त्यांचा हा निर्णय जनतेला पटला नाही आणि त्यांचे सरकार कोसळले. आता संपूर्ण फ्रान्समध्ये वातावरण बिघडत चालले आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने ८० हजारपेक्षा अधिक पोलीस आणि सुरक्षा दलाचे जवान तैनात केले आहेत.



२० महिन्यांत फ्रान्समधील सरकार चौथ्यांदा कोसळले


फ्रान्समध्ये राजकीय अस्थिरतेचे सावट अधिकच गडद झाल्याचे दिसून आले. अवघ्या नऊ महिन्यांपूर्वी स्थापन झालेले पंतप्रधान फ्रांस्वा बायरो यांचे सरकार सोमवारी कोसळले. विशेष बाब म्हणजे गेल्या २० महिन्यांत चार वेगवेगळ्या नेत्यांनी फ्रान्सच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे.

Comments
Add Comment

थायलंडमधील रेल्वेवर क्रेन कोसळल्याने २२ जणांचा मृत्यू

बँकॉक : थायलंडमध्ये एक अतिशय भीषण रेल्वे दुर्घटना घडली आहे. थायलंडच्या ईशान्य प्रांतात एक अवजड क्रेन रेल्वेवर

कॅनडात १४० कोटींच्या सोन्याची चोरी

मास्टरमाईंड भारतात लपल्याचा दावा टोरंटो : टोरंटो पिअरसन आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या २ कोटी कॅनेडियन

इराणशी व्यापार करणाऱ्या देशांवर अमेरिकेचा २५ टक्के आयातकर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प व्हेनेझुएलाचे स्वयंघोषित कार्यकारी अध्यक्ष

वॉशिंग्टन  : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ

इराणमध्ये अस्थिरता कायम; आंदोलनातील मृतांचा आकडा पाचशे पार..

तेहरान : इराणमध्ये सुरू असलेली सरकारविरोधी आंदोलनं अद्यापही थांबलेली नसून, देशातील अनेक भागांमध्ये परिस्थिती

इराणच्या स्वातंत्र्यासाठी लढण्यास अमेरिका तयार : ट्रम्प

वॉशिंग्टन : इराणमध्ये सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प