Friday, September 12, 2025

दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या सागरी प्रदर्शन व परिषदेचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उदघाटन

दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या सागरी प्रदर्शन व परिषदेचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उदघाटन

पुढील तीन दिवसात नवनवीन भागीदारी आणि व्यवसायाच्या संधी निर्माण होतील, मंत्री नितेश राणे यांचे आश्वासन  

मुंबई: दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या सागरी प्रदर्शन व परिषद INMEX SMM इंडिया च्या १४ व्या आवृत्तीचा आज बॉम्बे एक्झिबिशन सेंटर, गोरेगाव, येथे श्रीगणेशा करण्यात आला. दिनांक १०  ते १२ सप्टेंबर २०२५ या त्रिदिवसीय आयोजित प्रदर्शन आणि परिषदेत जगभरातील सागरी तज्ञ एकत्र येऊन सागरी क्षेत्रातील नवकल्पना तसेच धोरणांवर सखोल संवाद साधणार आहेत. या परिषदेचे उद्घाटन आज मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडले.

या परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना मंत्री नितेश राणे यांनी महाराष्ट्राला जागतिक सागरी केंद्र बनविण्याचा महत्वाकांक्षी दृष्टिकोन स्पष्ट केला. राज्याची Shipbuilding, Ship Repair आणि Ship Recycling Policy 2025 या धोरणाला महत्त्वाचे टप्पा मानून सागरी क्षेत्राच्या विकासासाठी त्याचा विशेष लाभ होईल असेही यावेळी नितेश राणे यांनी सांगितले.

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे म्हणाले की, महाराष्ट्र भारताच्या एकूण GDP मध्ये सर्वाधिक योगदान देणारे राज्य असून त्याच्या बंदरांचे देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळीत महत्त्वपूर्ण स्थान आहे. राज्यात सहा प्रमुख Shipyard Clusters उभारणीसाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जात असून, Mumbai Water Metro सारख्या जलवाहतुकीच्या प्रकल्पांमुळे सागरी क्षेत्राला मोठी चालना मिळत आहे. त्याचप्रमाणे वाढवणसह प्रमुख बंदरांशी मल्टीमॉडल कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करून महाराष्ट्र निर्यातवाढ व औद्योगिक प्रगतीत आघाडीवर राहणार असल्याचेही मंत्री राणे यांनी स्पष्ट केले.

सदर कार्यक्रमात श्याम जगन्नाथन (डिरेक्टर जनरल ऑफ शिपिंग), मोनिका नागेलगार्ड (रॉयल नॉर्वेजियन कॉन्सुलेट जनरल, मुंबई), इन्स्पेक्टर जनरल भीष्म शर्मा, सब्यसाची हजारा (चेअरमन – INMEX SMM इंडिया सल्लागार मंडळ), योगेश मुद्रास (एमडी इन्फॉर्मा मार्केट्स इंडिया) व उल्हास बोयासी (हॅम्बर्ग मेसे आणि काँग्रेस जीएमबीएच) उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमात सहभागी असलेल्या सर्व देशी-विदेशी ब्रँड्स आणि प्रतिनिधींना शुभेच्छा देत मंत्री नितेश राणे यांनी पुढील तीन दिवसांत नवनवीन भागीदारी आणि व्यवसायाच्या संधी निर्माण होतील, असा विश्वास व्यक्त केला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा