Tuesday, September 9, 2025

अखेर तो क्षण आला आयफोन १७ टीम कूक यांच्या हस्ते लाँच

अखेर तो क्षण आला आयफोन १७ टीम कूक यांच्या हस्ते लाँच

प्रतिनिधी:आज तो क्षण आयफोन चाहत्यांसाठी आला आहे. काही क्षणापूर्वी आयफोन १७ बाजारात लाँच करण्यात आला आहे. स्वतः कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) टीम कूक यांनी यावेळी 'आपण कोण आहोत आणि आपण काय करतो यासाठी अ‍ॅपल डिझाइन नेहमीच मूलभूत राहिले आहे' असे ते उद्गार त्यांनी यावेळी काढले. यावर्षी अँपलकडून आयफोन १७, आय फोन १७ एअर, आयफोन १७ प्रो ,आयफोन १७ मॅक्स ही प्रोडक्ट लाईन अँपल बाजारात दाखल करत आहे.

या वर्षीच्या आयफोन लाँच इव्हेंटला 'अवे ड्रॉपिंग' असे नाव देण्यात आले आहे ज्यामध्ये अँपल चार नवीन मॉडेल्सचा शुभारंभ करणार आहे. त्यांच्यासोबत एक नवीन अपडेट वेरिंएट असलेला आ यफोन, दीर्घकाळापासून सुरू असलेला आणि अत्यंत अपेक्षित असलेला आयफोन १७ एअर देखील असेल.अँपलकडून आतापर्यंत बनवलेला सर्वात पातळ (Slim) आयफोन म्हणून बाजारात आ णेल अशी अटकळ आहे. त्याची डिझाइन आणि प्रमुख वैशिष्ट्ये आधीच लीक झाली आहेत.आयफोन १७ प्रो आणि प्रो मॅक्स व्हेरिएंटसाठी अपग्रेडेड व्हेपर चेंबर कूलिंग सिस्टम असण्याची शक्य ता आहे. या डिव्हाइसेसमध्ये ८K व्हिडिओ रेकॉर्डिंगसह ४८- मेगापिक्सेलचे उच्च-रिझोल्यूशन ट्रिपल कॅमेरे आणि इतर वैशिष्ट्ये देखील असण्याची अपेक्षा आहे.

नव्या माहितीनुसार, आयफोन १७ मध्ये मजबूत A19 Chipset असल्याचे कंपनीने जाहीर केले. कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी अँपल इंटेलिजन्सचा वापर करण्यात आल्याने डिव्हाईसला चार चांद लागले जाऊ शकतात. सिरामिक शिल्डसह आयओएस २६ चा समावेश फोनमध्ये असेल.

याशिवाय अँपलकडून ५G कनेक्टिव्हिटीसह पहिले ॲपल वॉच

ॲपलने अधिकृतपणे आपले वॉच सिरीज ११ ची घोषणा केली आहे, कंपनीच्या मते ती जी टिकाऊपणा, कनेक्टिव्हिटी आणि आरोग्य-केंद्रित नवोपक्रमाचे नवीन स्तर आणते. डिझाइनमध्ये ते त्या च्या पूर्ववर्तींसारखेच असले तरी, सिरीज ११ अँपलच्या स्मार्टवॉच लाइनअपसाठी अनेक प्रथम खास वैशिष्ट्ये सादर करते.अँपलने स्मार्टवॉचमध्ये ५G सपोर्टची सुरुवात केली आहे, जी मागील मॉडेल्सवरील ४G LTE मानकांपेक्षा एक मोठी सुधारणा आहे. अँपल कंपनीच्या दाव्यानुसार तुम्ही जिथे असाल तिथे जलद, अधिक विश्वासार्ह कनेक्टिव्हिटी सक्षम करते, घड्याळाच्या इतर प्रगत वैशिष्ट्यांना पूरक आहे.

अँपल वॉच सिरीज ११: नवीन मॉडेलमध्ये स्लीप स्कोअर वैशिष्ट्य देखील समाविष्ट असल्याचे कंपनीने म्हटले आहे जे रात्रीच्या विश्रांतीच्या गुणवत्तेचे स्पष्ट चित्र प्रदान करण्यासाठी झोपेचा वेळ,झो पेच्या टप्प्या आणि इतर मेट्रिक्सचे मूल्यांकन अचूकपणे करते.आरोग्य देखरेखीमध्ये (Health Watch) साठीच पहिल्यांदाच आपल्या प्रोडक्ट लाईनमध्ये अँपल वॉच गेल्या ३० दिवसांत गोळा केले ल्या आरोग्य डेटाचे विश्लेषण करून उच्च रक्तदाब आणि दीर्घकालीन उच्च रक्तदाबाचे निरीक्षण करण्यास सक्षम असेल असे कंपनीचे म्हणणे आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा