Wednesday, September 10, 2025

मोठी बातमी: जीएसटी कपातीचा आणखी एक फायदा - ग्राहक उपभोगात सप्टेंबरमध्ये लाखो कोटींची वाढ

मोठी बातमी: जीएसटी कपातीचा आणखी एक फायदा - ग्राहक उपभोगात सप्टेंबरमध्ये लाखो कोटींची वाढ

प्रतिनिधी:बँक ऑफ बडोदाच्या नव्या अहवालानुसार, जीएसटी दर कपातीमुळे सप्टेंबरपासून ग्राहक उपभोगात (Consumer Expectations) १ लाख कोटींनी वाढला आहे. बँक ऑफ बडोदाने (BoB) आपला अहवाल जाहीर केला. त्यातील माहितीनुसार, जीएसटी कपातीसह जीएसटी परिवर्तनामुळे हा टप्पा गाठणे शक्य झाल्याचे निरीक्षण अहवालात नोंदवण्यात आले. निव्वळ उपभोगा त (Net Consumption) मध्ये ०.७ लाख ते १ लाख कोटींने वाढ झाली आहे. देशाच्या एकूण सकल देशांतर्गत उत्पादन (Gross Domestic Product GDP) तुलनेत ०.२ ते ०.३% आहे.

याविषयी मत मांडताना अहवालात म्हटले गेले आहे की, 'सप्टेंबर महिन्यापासून ०.७ लाख कोटी ते १ लाख रुपयांवर व्यक्तिगत उपभोग पोहोचला आहे जो एकूण जीडीपीतील ०.२ ते ०.३% आहे. जीएसटीतील तर्कशुद्धीकरण (GST Rationalisation) हे उपभोगातील वाढीचा मुख्य चालक (Driver) असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. मुख्यतः दरकपातीमुळे लोकांच्या हाता त अधिकचा पैसा संचित झाल्यामुळे बचतीतील अधिकचा पैसा खर्चासाठी उपलब्ध झाला ज्यामुळे अंतिमतः मागणी वाढली असे निरीक्षण अहवालात नमूद करण्यात आले. विशेषतः कंज्यूमर ड्युरे बल्स, एफएमसीजी उत्पादने अथवा ग्राहक उपयोगी वस्तू त दरकपात झाल्याने मोठ्या प्रमाणात मागणीत वाढ झाली. या वस्तूंना केंद्र सरकारने ५% स्लॅबमध्ये निश्चित केले. परिणामी मागणीत वाढ झाली.

सध्याच्या घडीला घरगुती उत्पादनासह इतर मागणीत वाढ होत आहे. ज्यामुळे जीएसटी कपातीचा १० ते ११% हिस्सा उपभोगात वापरला जातोय असे मत अहवालाने नोंदवले. त्यामुळे करपात्र उप भोग (Taxable Consumption) आगामी काळात १५० ते १६० कोटींवर पोहोचेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अजून जीएसटी संकलनाची नवी माहिती समोर आली नाही ती आल्यावर कलेक्शन आकडेवारी अधिक स्पष्टपणे समोर येईल. जेवण, अन्न, पेय या प्रवर्गाचे योगदान सीपीआय बास्केट (Consumer Price Index) म्हणजेच ग्राहक किंमत निर्देशांकात ९% आहे. त्यामुळे आगामी काळात या श्रेणीतील महागाईत २५ ते ३५ बीपीएस पूर्णांकांने घसरण होऊ शकते असे अहवालात म्हटले. जीएसटी कपातीचा सर्वाधिक फायदा कोर (मुख्य) महागाईत आहे. मात्र कोर म हागाईत या अतिरिक्त उपभोगाने १०% वाढ या जीएसटी कपातीमुळे होऊ शकते. या श्रेणीतील वस्तूंच्या किमतीत ७.४% घसरण अपेक्षित आहे. त्यामुळे एकूणच या जीएसटी कपातीचा फायदा के वळ ग्राहक उपयोगी वस्तूंना नाही तर संपूर्ण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका पार पाडेल. तरी अहवालानुसार हेडलाईन इन्फ्लेशनमध्ये दरकपातीमुळे पूर्वीच्या ३.५% वरून ३.१% वर घसरण होऊ शकते. एकूणच या कपातीचा फायदा संपूर्ण देशातील नागरिकांना व अर्थव्यवस्थेला झाला असा अहवालातील निष्कर्ष बँक ऑफ बडोदा प्रसिद्ध केला आहे.

Comments
Add Comment