दुबई: क्रिकेटप्रेमींसाठी आजचा दिवस खास आहे, कारण टी-20 फॉर्मेटमधील एशिया कप 2025 मध्ये आजपासून भारतीय संघाच्या अभियानाला सुरुवात होत आहे. गतविजेता असलेल्या टीम इंडियाचा पहिला सामना यजमान संयुक्त अरब अमिराती (UAE) सोबत दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८:०० वाजता सुरू होईल.
भारतासाठी स्पर्धेची चांगली सुरुवात आवश्यक
भारतीय संघाने आठ वेळा एशिया कपचे विजेतेपद पटकावले आहे आणि यंदा सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली संघ विक्रमी नवव्या विजेतेपदाच्या शोधात आहे. या सामन्यातून टीम इंडिया मजबूत विजयासह स्पर्धेत आपला दबदबा कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. यूएईचा संघ आपल्या घरच्या मैदानावर खेळणार असल्याने, त्यांना कमी लेखण्याची चूक भारतीय संघ करणार नाही.
खेळपट्टी आणि संघाची रणनीती
दुबईची खेळपट्टी नेहमीच वेगळ्या आव्हानांसाठी ओळखली जाते. सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना थोडी मदत मिळण्याची शक्यता आहे, पण जसजसा सामना पुढे जाईल, तसतसे खेळपट्टी फिरकीपटूंसाठी अनुकूल होईल. त्यामुळे भारताला आपल्या प्लेइंग-११ मध्ये फिरकीपटूंचा योग्य समावेश करावा लागेल.
संभाव्य प्लेइंग-११
भारतीय संघ: सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टिरक्षक), जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, आणि वरुण चक्रवर्ती.
यूएई संघ: मोहम्मद वसीम (कर्णधार), अलीशान शराफू, मोहम्मद जोहैब, राहुल चोप्रा (यष्टिरक्षक), आसिफ खान, हर्षित कौशिक, मोहम्मद फारूक, सागीर खान, हैदर अली, जुनैद सिद्दीक, आणि मोहम्मद जवादुल्लाह.
हा सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट पाहता येईल, तर सोनी लिव्ह ॲपवर त्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.