नवी दिल्ली: भारताच्या १७व्या उपराष्ट्रपतीपदासाठी आज संसद भवनात मतदान होणार आहे. या पदासाठी सामना एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन आणि इंडिया ब्लॉकचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांच्यात आहे. ही निवडणूक १६वे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी २१ जुलैला आरोग्याच्या कारणामुळे अचानक राजीनामा दिल्याने होत आहे.
मतदान सकाळी १० वाजल्यापासून ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत खोली नंबर १०१, वसुधामध्ये होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी १० वाजता मतदान करतील. उपराष्ट्रपतीपद निवडणुकीसाठी मतदान होण्याआधी एनडीएचे खासदार सकाळी साडेनऊ वाजता ब्रेकफास्ट मीटिंगमध्ये सहभागी होतील. केंद्र सरकारचे वरिष्ठ मंत्री आपापल्या राज्यांच्या खासदारांचे यजमानपद रतील.
उपराष्ट्रपतीपदासाठी मतमोजणी संध्याकाळी ६ वाजता सुरू होईल आणि त्यानंतर मंगळवारी रात्री उशिरा अथवा बुधवारी सकाळपर्यंत निकाल घोषित होतील.
नवी दिल्ली: भारताच्या उपराष्ट्रपतीपदासाठी आज, ९ सप्टेंबर २०२५ रोजी मतदान पार पडले. या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन आणि 'इंडिया' आघाडीचे उमेदवार माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांच्यात थेट लढत झाली. या निवडणुकीचे निकाल आजच जाहीर होण्याची शक्यता आहे.
निवडणुकीतील आकडेवारी
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमध्ये लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांचे सदस्य मतदान करतात. या निवडणुकीत एकूण ७८१ मतदार आहेत.
निवडणुकीतील प्रमुख उमेदवार
एनडीएचे उमेदवार: सी. पी. राधाकृष्णन
'इंडिया' आघाडीचे उमेदवार: माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी