Thursday, September 11, 2025

इन्फोसिस कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त वाढ 'या' कारणास्तव

इन्फोसिस कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त वाढ 'या' कारणास्तव

मोहित सोमण: इन्फोसिस कंपनीचा शेअर सकाळी १० वाजेपर्यंत ३.८०% उसळल्याने आज बाजारात रॅली होण्यास कंपनीच्या शेअरने मदत केली‌. इन्फोसिस हा हेवीवेट आयटी शेअर म्हणून ओळखला जातो. कंपनीच्या संचालक मंडळाची (Board of Directo rs) ची ११ सप्टेंबरला महत्वाची बैठक होणार आहे त्यात शेअर बायबॅकला मंजूरी मिळणार आहे. यापूर्वी कंपनीने शेअर बायबॅकचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाला संचालक मंडळाने मंजूरी दिल्यास आतापर्यंत कंपनीच्या इतिहासातील हा पाचवा बायबॅक असणार आहे.कंपनीने रेग्युलेटरी फायलिंगमधील दिलेल्या माहितीनुसार, ११ सप्टेंबरच्या बैठकीत कंपनी बायबॅक करावा का यावर अंतिम मोहोर उमटवणार आहे. कंपनीने आपल्या एक्सचेंज फायलिंगमध्ये नेमके म्हटले आहे की,' इन्फोसिस लिमिटेडचे संचालक मंडळ ११ सप्टेंबर २०२५ रोजी होणाऱ्या त्यांच्या बैठकीत, भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड (सिक्युरिटीज बायबॅक) रेग्युलेशन्स २०१८ सुधारितनुसार, कंपनीच्या पूर्ण पेड-अप इक्विटी शेअर्सच्या बायबॅकच्या प्रस्तावावर विचार करेल.

एलओडीआर रेग्युलेशन्सच्या लागू तरतुदींनुसार, ११ सप्टेंबर २०२५ रोजी बोर्ड बैठकीच्या समाप्तीनंतर बोर्ड बैठकीचा निकाल स्टॉक एक्सचेंजेसना प्रसारित केला जाईल.' असे कंपनीने नियामकांना दिलेल्या फायलिंगमध्ये म्हटले आहे. यापूर्वी कंपनीने २०१७ साली १३००० कोटींचे शेअर ओपन मार्केटमधून खरेदी केले होते. ११५० रूपये प्रति शेअर नुसार हा सौदा यापूर्वी झाला होता ज्यामध्ये ११.३० कोटींचे शेअर कंपनीने पुनखरेदी केले होते. त्यानंतर २०१९ सालीही कंपनीने ८२६० कोटींचे शेअर पुनः खरेदी केले होते. त्यानंत र पुन्हा ओपन मार्केटमधून कंपनीने शेअरची पुन खरेदी (Buy Back) केली होती ज्यांचे मूल्यांकन ९२०० कोटींची होती. आणि अंतिम पुनः खरेदी २०२२ साली झाली होती ज्यामध्ये १८५० रूपये प्रति शेअरसह ९३०० कोटी मूल्यांकनाचे शेअर पुनः कंपनीने खरेदी केले होते.

कंपनीचे बायबॅक हे धोरणात्मक पाऊल -

युएससह जगभरात आयटी क्षेत्रात मंदी सुरु आहे. इतकेच नाही तर वॉल स्ट्रीटसह भारतातही आयटी शेअर्समध्ये मोठी घसरण गेल्या महिन्यात झाली आहे. परवाही १% पेक्षा अधिक पातळीवर आयटी शेअर डाऊ जोन्स आणि एस अँड पी सह भारतातील सेन्सेक्स व निफ्टीत आठवड्यात घसरले होते. जागतिक पातळीवरील एआय तंत्रज्ञानाच्या विकासासह अतिरिक्त कर्मचाऱ्यांची कूमक कपात यामुळे आयटीचा चेहरामोहरा बदलला आहे. आगामी काळात आणखी काही परिवर्तन (Transformation) पाहू शकतो.नुकता च डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या सिनेटरने युएसमध्ये विदेशी आयटी कंपन्यावर अतिरिक्त भार लावण्याचे व नवे निर्बंध लावण्याचे विधेयक मांडले आहे. असे असताना आगामी काळात आयटी क्षेत्रातील हालचाल पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. असे अस ले तरी इन्फोसिसच्या या नव्या पाऊलामुळे आगामी काळात इन्फोसिस शेअर मोठ्या प्रमाणात बाजारात हवा निर्माण करू शकतो. ज्यामध्ये कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे.इन्फोसिसने स्वतः चा शेअर खरेदी (Buy Back ) केल्यास कंपनीच्या ऑपरेशनल महत्वाकांक्षेचा प्रभाव गुंतवणूकदारांवर पडू शकतो व बाजारात इन्फोसिसच्या फंडामेंटलमध्ये मजबूती असल्याचा संदेश मिळू शकतो. याच कारणामुळे आज बाजारात इन्फोसिसचा शेअर उसळला आहे. सत्राच्या सुरुवातीलाच कंपनीचा शेअर ३.६३% उसळला होता.

Comments
Add Comment